शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

अन् मुलीची आईशी भेट झाली

By admin | Updated: October 6, 2014 22:36 IST

दुसरी बस पकडायची घाई असल्याने आई एसटीमधून खाली उतरली

सावंतवाडी : नेतर्डे येथून सावंतवाडीत आलेल्या एसटी बसमध्ये दोन वर्षाची एक मुलगी पालकांशिवाय आढळून आली. तिच्यासोबत कोणीही नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. चौकशीअंती ती मुलगी चुकून गाडीतच राहिल्याचे लक्षात आले. त्यानंतर बऱ्याच वेळाने त्या मुलीची आई बांदा येथून मुलीला शोधत सावंतवाडी बसस्थानकात दाखल झाली आणि ताटातूट झालेल्या आईची आणि मुलीची भेट झाली.ही घटना सोमवारी दुपारी घडली. दोन वर्षांची मुलगी स्रेहा सावंत आणि तिची आई (दोघे रा. मुंबई) काही दिवसांपूर्वीच सरमळे गावी आल्या होत्या. स्नेहाच्या आईचे माहेर सरमळे असून सासर तळकट येथे आहे. सोमवारी सकाळी स्नेहाला घेऊन तिची आई सरमळे येथून तळकटला निघाली होती. त्या नेतर्डे-सावंतवाडी एसटी बसमधून बांदा येथे आल्या. मात्र, बांदा येथे येताच दुसरी बस पकडायची घाई असल्याने स्नेहाची आई एसटीमधून खाली उतरली. धावपळीत तिने आपल्यासोबतचे सामान खाली उतरवले. आणि मुलगी आपल्यासोबतच खाली उतरली असेल असे मानतच एसटीतून खाली उतरली. त्यानंतर लगेचच एसटी सावंतवाडीच्या दिशेने निघून गेली. आणि स्नेहाच्या आईला स्नेहा गाडीतच राहिल्याचे लक्षात आहे. दरम्यान, ती मुलगी एसटीतून सावंतवाडी स्थानकात आली. मात्र, तिच्यासोबत कुणीच नसल्याचे पाहून एसटीचे चालक व वाहकही विचारात पडले. त्यांनी एसटी प्रशाननाच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांना ही गोष्ट सांगितली. मुलीचे काय करायचे, हा प्रश्न एसटी कर्मचाऱ्यांना पडला असतानाच, स्नेहाची आई शोधाशोध करत सावंतवाडी स्थानकात दाखल झाली. तिने आपल्या मोबाईलमधील मुलीचे फोटो दाखवत मुलगी आपली असल्याचे सांगत मुलीला मिठीच मारली. आणि अखेर आईची व मुलीची भेट झाली. मात्र, या साऱ्या प्रकारामुळे सावंतवाडीतील एसटी स्थानकावर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. (वार्ताहर)