Sindhudurg: रेल्वेच्या धडकेत सातोसेत वृद्ध जागीच ठार
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: August 23, 2023 15:53 IST2023-08-23T15:47:09+5:302023-08-23T15:53:39+5:30
बांदा : रेल्वेची धडक बसल्याने सातोसे-देऊळवाडी येथील एकाचा मृत्यू झाला. रामचंद्र राघोबा नाईक (६७) असे त्यांचे नाव आहे. ही ...

Sindhudurg: रेल्वेच्या धडकेत सातोसेत वृद्ध जागीच ठार
बांदा : रेल्वेची धडक बसल्याने सातोसे-देऊळवाडी येथील एकाचा मृत्यू झाला. रामचंद्र राघोबा नाईक (६७) असे त्यांचे नाव आहे. ही घटना आज, बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली.
याबाबतची माहिती रेल्वे प्रशासनाने सातोसे माजी सरपंच बबन सातोसकर यांना दिली. त्यांनी ग्रामस्थांसमवेत घटनास्थळी पाहणी केल्यानंतर त्यांची ओळख पटली. आज सकाळी मृतदेह शवविच्छेदनासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला. त्यांच्या पश्चात पाच भाऊ, मुलगा, विवाहित बहिणी असा परिवार आहे.
दरम्यान या वृद्धाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला. याचे कारण स्पष्ट झाले नाही. रेल्वेखाली आत्महत्या केली की अन्य काही याबाबतचा अधिक तपास पोलिसांना करावा लागणार आहे.