शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

कृषी पर्यटन अभ्यासक्रम सुरू करणार

By admin | Updated: June 4, 2015 00:03 IST

दीपक केसरकर : वेंगुर्ले फळसंशोधन केंद्रात पर्यटन विषयावर चर्चासत्र

वेंगुर्ले : येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात अद्ययावत ‘कृषी पर्यटन’ विषयक अभ्यासक्रम सुरू करणार आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेला विद्यार्थी कृषी पर्यटनातून स्वयंरोजगार निर्मिती करण्यासाठी सर्वार्थाने सक्षम असेल, असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात आयोजित चर्चासत्रात केले. वेंगुर्ले येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात ‘ग्रामीण कृषी विकास आणि कृषी पर्यटन’ या चर्चासत्राचे आयोजन पालकमंत्री केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले. यावेळी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीचे कुलगुरू डॉ. बी. वेंकटेश्वर्लू उपस्थित होते. कुलगुरू डॉ. वेंकटेश्वर्लू यांनी, कोकणात दरवर्षी लाखो पर्यटक येतात, अशा पर्यटकांना कृषी पर्यटनाकडे आकर्षित करणे गरजेचे आहे. याकरिता कृषी पर्यटन प्रकल्पाची जास्तीत जास्त प्रसिद्धी एमटीडीसीच्या माध्यमातून देण्यात यावी, असे प्रतिपादन केले. पालकमंत्री केसरकर यांच्या संकल्पनेतून साकारणारा तीन महिने, सहा महिने व बारा महिने कालावधींचा ‘कृषी पर्यटन’ विषयक अभ्यासक्रम हा देशातील पहिलाच अशा प्रकारचा उपक्रम असून, याला विद्यापीठाचे पूर्ण सहकार्य लाभेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी ग्रामविकास मंत्रालयाचे सहसचिव दीपक मोरे यांनी कृषी पर्यटन अभ्यासक्रमाचे महत्त्व विशद केले. जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी योग्य नियोजन झाल्यास पर्यटन व्यवसायामध्ये आपण गोवा राज्याच्याही पुढे जाऊ शकतो, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. उत्तम महाडकर, अधिष्ठाता डॉ. रमेश बुरटे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र साळगावकर यांच्यासह फळ संशोधन केंद्रातील तसेच विविध खात्यांचे अधिकारी व जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)‘मँगो व्हिलेज’ संकल्पना राबविणार\पलकमंत्री केसरकर म्हणाले, केरळ व गोवा राज्यात ‘स्पाईप व्हिलेज’ ही संकल्पना राबविण्यात आली आहे. या धर्तीवर सिंधुदुुर्ग जिल्ह्यात कृषी पर्यटनाखाली ‘मँगो व्हिलेज’ ही संकल्पना राबविण्यात यावी. या अभ्यासक्रमासाठी आवश्यक निधी लवकरच विद्यापीठाला उपलब्ध करून दिला जाईल, असे केसरकर यांनी सांगितले.