शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

आरती सरवणकर विद्यापीठात चौथी !

By admin | Updated: August 7, 2015 22:35 IST

कोकणचा झेंडा : राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचा उत्कृष्ट निकाल

देवरूख : मुंबई विद्यापीठ अभियांत्रिकी शाखेच्या अंतिम वर्षाच्या पदवी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील आॅटोमोबाईल शाखेच्या ३ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवले आहे. याहीवर्षी सर्वच विभागांमध्ये महाविद्यालयाचे निकाल हे विद्यापीठाच्या सरासरी निकालापेक्षा सरस ठरले आहेत. यावर्षी महाविद्यालयाच्या आॅटोमोबाईल विभागातून आरती सरवणकर ही विद्यार्थिनी ७५.३८ टक्के गुण मिळवून विशेष प्राविण्यासह विद्यापीठात चौथी आली. प्रशील गिर्डे व विनय सरदेसाई ह्या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे ७४.३४ टक्के आणि ७३.७९ टक्के गुण मिळवून आॅटोमोबाईल विभागाच्या विद्यापीठ गुणवत्ता यादीत अनुक्रमे ८वा व १०वा क्रमांक पटकावला. माहिती तंत्रज्ञान या शाखेचा महाविद्यालाचा निकाल १०० टक्के लागला असून, कौस्तुभ मडकइकर हा ७४.६० टक्के गुण मिळवून महाविद्यालयामध्ये प्रथम आला. रुपाली लोकम आणि स्नेहल नाईक ह्यांनी अनुक्रमे ७२.७३ टक्के व ७२.४६ टक्के गुण मिळवून दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला. संगणक विभागाचा निकाल ९८.६६ टक्के लागला असून, अंकिता चिखले, विपूल गुरव आणि अंकिता बोभाटे हे अनुक्रमे ७३.४६ टक्के, ७३.२० टक्के व ७२.८० टक्के गुण मिळवून महाविद्यालयामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.अणुविद्युत व दूरसंचार विभागाचा निकाल ८८.४६ टक्के लागला असून, गणेश मोरे, संजीवनी सनगरे आणि मंदाकिनी सावंत हे अनुक्रमे ७५.३५ टक्के, ७२.२५ टक्के व ७१.९३ टक्के गुण मिळवून महाविद्यालयामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.यांत्रिकी विभागाचा निकाल ७५.०० लागला असून, संतोष बारदेस्कर, राजेंद्र वेलकर आणि स्वानंद जोशी हे अनुक्रमे ७४.१३ टक्के, ७३.७३ टक्के व ७१.०६ टक्के गुण मिळवून महाविद्यालयामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. महाविद्यालयातील सर्व विभागांमधून एकूण ३४५ विध्यार्थी परीक्षेला बसले होते. पैकी ४८ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, तर १६८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.संस्थाध्यक्ष रवींद्र माने, कार्याध्यक्षा नेहा माने, उपाध्यक्ष मनोहर सुर्वे, चंद्रकांत यादव, दिलीप जाधव, प्राचार्य डॉ. महेश भागवत व सर्व प्राध्यापकांनी यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.