कणकवली: शहर गड आणि जानवली या दोन नद्यांच्या मध्ये वसलेले आहे. पावसाळ्यात दोन्ही नद्या भरून वाहतात, आजूबाजूला हिरवीगार झाडे, दाट धुके, आणि पाण्याचा प्रवाह यामुळे संपूर्ण परिसरात एक जादुई शांतता आणि सौंदर्य अनुभवता येते. परेश कांबळी यांनी ड्रोन कॅमेऱ्यातून ही विहंगम दृश्ये टिपली आहेत.ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेली दृश्ये पाहिल्यास, दोन नद्यांच्या मध्ये वसलेले कणकवली शहर आणि त्याभोवतीचे निसर्गसौंदर्य हे पावसाळ्यात आणखी खुलून दिसते. दाट धुक्यामुळे कधी कधी शहर धूसर दिसते, तर कधी चमचमणारे दिवे आणि पाण्यावरील प्रतिबिंब यामुळे दृश्य अधिकच आकर्षक होते. पावसाळ्यातील रात्री, नद्यांचा आवाज, गारवा, आणि निसर्गाच्या सान्निध्यातील शांतता कणकवलीच्या विहंगम दृश्याला एक वेगळाच अनुभव देतात.
Sindhudurg: पावसाळ्यात दोन नद्यांच्या संगतीत कणकवलीचा रात्री टिपलेला रमणीय नजारा -video
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 15:53 IST