शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी विभागात ७३ लाखांची तिकिटे शिल्लक

By admin | Updated: July 24, 2015 00:40 IST

एस. टी. महामंडळ : मोठ्या रकमेच्या तिकिटांना वालीच नाही

रत्नागिरी : गेल्या दोन वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक्स मशिनव्दारे तिकिटे देण्यात येत असल्यामुळे रत्नागिरी विभागात ७२ लाख ८६ हजार ६८ रुपयांची छापिल तिकिटे शिल्लक राहिली आहेत. ईटीएम मशीन बंद पडल्यास पर्यायी जुन्या तिकीट ट्रेचा वापर करण्यात येतो. मात्र, संबंधित तिकिटे देत असताना मोठ्या रकमेच्या तिकिटांबरोबर छोट्या रकमेची तिकीटे जोडून दिली जातात. परंतु छोट्या रकमेची तिकिटे संपल्यामुळे मोठ्या रकमेची तिकिटे शिल्लक राहिली आहेत.रत्नागिरी विभागात दोन वर्षांपूर्वी ईटीएम मशिनव्दारे तिकीटे देण्यास प्रारंभ झाला. या मशिनवर संबंधित मार्गाची माहिती तसेच प्रत्येक किलोमीटरप्रमाणे तिकिटे व त्यांचे दर याची माहिती असते. त्यामुळे वाहकाला प्रवाशांनी थांब्याचे नाव सांगताच तिकीट देणे सोपे होते. शिवाय हिशेबही ठेवणे सोयीस्कर होत आहे. मात्र, तिकीट ट्रे मधील तिकिटे किती संपली, किती शिल्लक राहिली, याचा हिशेब लिहून त्याप्रमाणे हिशेब द्यावा लागतो. यामध्ये नजरचुकीने कमी अधिक होण्याची शक्यता असते. त्यामुळे तिकीट ट्रे वाहकांना कटकटीचा ठरत होता. मात्र, ईटीएम हाताळणे सोपे व सोयीस्कर वाटू लागले आहे.राज्य मार्ग परिवहन महामंडळाने तिकिटे संपवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार वाहकांना ईटीएमबरोबर अधूनमधून तिकिटे वापरण्यास सांगण्यात येते. मात्र, जोडून देण्यात येणारी कमी रकमेची तिकिटे शिल्लक नसल्यामुळे मोठ्या रकमेची लाखोच्या घरातील तिकिटे शिल्लक राहिली आहेत.एक रुपयाची सर्व तिकिटे संपली आहेत. २ रूपयांची केवळ ४००, ३ रूपयांची २००, ४ ते ९ रूपयांची शून्य, तर १० रूपयांची केवळ ९०० तिकीटे शिल्लक राहिली आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी निम्या आकारात प्रवास सवलत देण्यात येतो. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या तिकीटापैकी १ रूपयांची ३००, तर २ रूपयांची ५०० तिकीटे शिल्लक राहिली आहेत. या मार्गावरील ८ रुपयांची २८००, १० रुपयांची १६००, तर १२ रुपयांची ३९००, तर १३ रूपयांची ४०० तिकिटे शिल्लक राहिली आहेत.तिकीट ट्रे व त्याचा हिशेब सांभाळण्यापेक्षा ईटीएम मशीन वापरण्यास वाहक प्राधान्य देत आहेत. शहरी मार्ग असो वा ग्रामीण ईटीएम मशीनचा वापर सर्रास होत आहे. ईटीएम मशीन चार्जिंग करावे लागते. त्यामुळे अनेकवेळा मशीन बंद पडण्याचा प्रकार घडतो. परंतु त्यावेळी नाईलाजाने वाहकांना तिकीट ट्रेचा आधार घ्यावा लागतो. मात्र, सध्या कमी रकमेची तिकिटे संपल्यामुळे वाहकांपुढे कोणती तिकिटे द्यावीत, असाही प्रश्न पडत आहे. (प्रतिनिधी)मंडणगड आगारात ३७ लाख १० हजार ४२१, दापोली येथे ४९ लाख ५० हजार, चिपळुणात १४ लाख २० हजार, गुहागर १ लाख ५२ हजार ७५ हजार, देवरूख ५४ लाख २६ हजार २००, रत्नागिरी १७ लाख ७१ हजार २०४, लांजा ७७ लाख २७ हजार ५००, राजापूर २५ लाख ३३ हजार ३०० मिळून एकूण ७२ लाख ८६ हजार ६८ रूपयांची तिकिटे शिल्लक राहिली आहेत.