शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वे मार्गावर ५५० कर्मचाऱ्यांची गस्त

By admin | Updated: June 6, 2015 00:24 IST

कोकण रेल्वे प्रशासनातर्फे २९ मेपासून ‘रेल यात्री उपभोक्ता अभियाना’ला प्रारंभ झाला असून, ९ जून रोजी या अभियानाची सांगता होणार आहे.

रत्नागिरी : मान्सूनपूर्व दक्षतेच्या दृष्टीने कोकण रेल्वेने आतापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत. ८ जून ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत ५५० कर्मचाऱ्यांच्या मदतीने धोकादायक वाटणाऱ्या ७८ क्षेत्रांमध्ये २४ तासांची गस्त सुरू ठेवण्यात येणार आहे. तसेच स्वच्छतेला प्राधान्य दिले जाणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक बाळासाहेब निकम यांनी दिली. कोकण रेल्वे प्रशासनातर्फे २९ मेपासून ‘रेल यात्री उपभोक्ता अभियाना’ला प्रारंभ झाला असून, ९ जून रोजी या अभियानाची सांगता होणार आहे. याची माहिती देण्यासाठी कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक बाळासाहेब निकम यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यानिमित्ताने ७ रोजी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून, त्यांचे बक्षीस वितरण ९ जून रोजी करण्यात येणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले. ते म्हणाले, या अभियानादरम्यान प्रवाशांच्या दोन मागण्या प्रामुख्याने पुढे आल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे कोकण रेल्वेचे आरक्षण चार महिने आधी करूनही लगेच गाड्या फुल्ल होतात. यासाठी प्रशासनाने या मार्गावर गाड्या वाढवाव्यात अथवा डबे तरी वाढवावे. तसेच दुसरी मागणी म्हणजे ‘प्लॅटफॉर्म शेल्टर’ची लांबी वाढवावी. या दोन्ही मागण्या योग्य असून, प्रशासनापुढे ठेवण्यात आल्या आहेत. राज्यराणी किंवा शताब्दी या दोन्ही गाड्यांमध्ये डबे वाढविणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. हे अभियान सुरू झाल्यानंतर प्रशासनाने स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. या दरम्यान केवळ रेल्वे स्थानके नव्हे; तर रूळांमधील कचराही स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले आहे. करबुडे येथील बोगद्यातून दोन ट्रक कचरा गोळा करण्यात आला असून, त्यात प्लास्टिकच्या बाटल्यांची संख्या लक्षणीय दिसून आली, ही बाब गंभीर असल्याचे निकम यांनी सांगितले. या सप्ताहनिमित्ताने रत्नागिरी येथे ८ रोजी आणि कणकवली येथे ९ रोजी प्रवासी आणि कोकण रेल्वे कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. पावसाळापूर्व सुरक्षिततेबाबत ते म्हणाले की, कोकण रेल्वे मार्गावर आता गस्त सुरू राहणार असून, आजपासून सरावासाठी ही गस्त सुरू करण्यात आली आहे. या मार्गावरील ७८ क्षेत्रातही गस्त सुरू राहणार आहे. यात ६४ बोगद्यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. यात संवेदनशील १३ क्षेत्रांमध्ये गस्त सुरू राहणार आहे. (प्रतिनिधी)