शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पावरील ४५ लाख खर्च निरूपयोगी ठरलाय

By admin | Updated: August 11, 2015 23:16 IST

दापोली नगरपंचायत : निसर्गऋण प्रकल्प ‘कचऱ्यात’

दापोली : शहरातील ओल्या कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी दापोली नगरपंचायतीचे तत्कालिन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी मिथेन वायूवर पथदीप प्रज्वलित करण्याचे स्वप्न दाखवले होते. प्रत्यक्षात हे स्वप्न दिवास्वप्नच ठरले असून, निसर्गऋण प्रकल्पाचा उद्देश फसल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे निसर्गऋण प्रकल्पासाठी करण्यात आलेला आजपर्यंतचा ४५ लाख ५० हजारांचा खर्च कचऱ्यात गेल्याचा आक्षेप नागरिकांनी घेतला आहे. मुंबई येथील भाभा अणुसंशोधन केंद्राच्या केंद्रीय कृषी व जैवतंत्रज्ञान विभागाने कचऱ्याची विल्हेवाट लावून आर्थिक नफा मिळवून देणारा निसर्गऋण प्रकल्प दापोलीत कार्यान्वित केला. खत निर्मिती करणे, मिथेन वायू निर्मिती करणे, दापोलीतील पथदीप प्रकाशित करणे अशी उद्दिष्टे समोर ठेवून आॅगस्ट २००६मध्ये या प्रकल्पाला सुरूवात झाली. नगरपंचायतीचे पहिले नगराध्यक्ष अविनाश केळसकर यांनी दापोलीकरांचा कचरा प्रश्न निकाल काढण्यासाठी हा प्रकल्प दापोलीत आणला. भाभा अणुसंशोधन केंद्राचे डॉ. शरद काळे यांनी प्रकल्पाचे महत्त्व पटवून देत २५ ते २८ लाखांत प्रकल्प होईल, असे संकेत दिले होते. तब्बल ४ वर्षांच्या कालावधीनंतर पूर्णत्त्वास गेलेल्या प्रकल्पाला सुमारे ३३ लाखांचा खर्च झाला. तत्कालीन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी या प्रकल्पाचा उद्देश लवकरच सफल होईल, असा विश्वास २०१० मध्ये देऊन प्रकल्पाच्या माध्यमातून स्वच्छ दापोली सुंदर दापोलीचे चित्र उभे केले होते.३० क्युबीक मीटर बायोगॅसचा वापर करून ४०० पथदीप पेटवण्याचा प्रयोग केल्याचे त्यांनी सांगितले. गॅस साठविण्यासाठी बलून्स व २ फीडर्सची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले होते. सुमारे ३ ते ५ टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची क्षमता असलेल्या निसर्गऋण प्रकल्पाचे उद्दिष्ट सफल झाले की नाही, याचा विचार केला तर या प्रकल्पावरील खर्च कचऱ्यातच गेल्याची भावना जनमानसात निर्माण झाली आहे.सद्यस्थितीचा विचार करता एकही पथदीप या प्रकल्पाच्या माध्यमातून उजळलेला नाही. मिथेन वायू तयार झाला तरीही तो वायू साठवून ठेवण्याची व्यवस्था नगरपंचायतीकडे नाही. लाखो रूपये खर्चून उभारलेल्या टाक्या, वायू साठवण्यासाठी घेतलेले बलून्स यांची अवस्था बिकट झाली आहे. बलूनमध्ये वायू साठविण्याची क्षमताच उरलेली नाही, तर वीजनिर्मिती कशी होणार, हे न उलगडणारे कोडे आहे. वीज तयार केली तर ती साठवणूक करण्याची काहीच यंत्रणा उपलब्ध नाही. २००६-२००७मध्ये ३३ लाख, २००९-२०१० मध्ये १२ लाख ५० हजार असे सुमारे ४५ लाख ५० हजार खर्चूनही दापोलीत एकही दिवा पेटलेला नाहीच, शिवाय कचरा प्रश्न पूर्णपणे सुटलेला नाही. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी अजूनही डंपिंग ग्राऊंडचा उपयोग करावा लागत आहे.सध्याचा निसर्गऋण प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी अजून सुमारे १५ लाखांचा निधी खर्ची टाकावा लागणार आहे. प्रीडायझेस्टरसाठी सुमारे २ लाख ९८ हजार, गॅस बलून्स नवीन खरेदी करण्याकरिता ६ लाख ८५ हजार, तर वीजनिर्मिती करून शहरातील गार्डनमध्ये वीजपुरवठा करण्यासाठी ६ लाख रुपयांचा निधी आवश्यक असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. तशा निविदाही निघाल्या आहेत.प्रकल्पाचा खर्च दुप्पट झाला आहे. तरीही उद्दिष्टे सफल किती झाली, हे न उलगडणारे कोडेच आहे. कचरामुक्ती होऊन दापोली शहरात पथदीप निसर्गऋणमुळे केव्हा प्रकाशमान होतील, याकडे डोळे लागून राहिले आहेत.(प्रतिनिधी)प्रयत्न तोकडे पडले ...दापोली शहरातील कचऱ्याचा प्रश्न गेली अनेक वर्षे गाजत आहे. या ठिकाणी घनकचऱ्याचे व्यवस्थापन करून त्यापासून ऊर्जानिर्मिती करण्याचे प्रयत्न झाले आहेत. निसर्गऋण प्रकल्प हा त्याचाच एक भाग आहे. ओल्या कचऱ्याची समस्या मिटविण्यासाठी तात्कालिन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी पथदर्शी प्रकल्प सुरू करण्याचे प्रयत्न चालविले होते. यावर झालेला खर्च वाया गेल्याचे जनतेचे म्हणणे आहे. या साऱ्या प्रकाराबद्दल आता चर्चा सुरू आहे.