लैंगिक जीवन : शारीरिक संबंधावेळी लवकर थकवा येतो, काय करू?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 16:42 IST2020-03-20T16:41:04+5:302020-03-20T16:42:40+5:30

माझं वय 45 वर्षे आहे. वजन जरा वाढलेलं आहे. शारीरिक संबंध ठेवताना लवकर थकवा येतो आणि धाप लागते.

Sexual Life: I get tired very fast while doing sex what shall i do? api | लैंगिक जीवन : शारीरिक संबंधावेळी लवकर थकवा येतो, काय करू?

लैंगिक जीवन : शारीरिक संबंधावेळी लवकर थकवा येतो, काय करू?

(Image Credit : menshealth.com)

प्रश्न - माझं वय 45 वर्षे आहे. वजन जरा वाढलेलं आहे. शारीरिक संबंध ठेवताना लवकर थकवा येतो आणि धाप लागते. मला अनेकदा शारीरिक संबंध अर्धवट सोडावा लागतो. काय करू?

उत्तर - या समस्येवर दोनप्रकारे उपाय करता येऊ शकतो. एक म्हणजे तुम्ही शारीरिक संबंध ठेवताना वेगवेगळ्या पोजिशन ट्राय करा. वुमन ऑन टॉप ही पोजिशन तुमच्यासाठी बेस्ट ठरेल. कारण या पोजिशनमध्ये तुमची मुव्हमेंट कमी होते. त्यामुळे थकवा येण्याची आणि धाप लागण्याची समस्या कमी होईल किंवा दूर होईल. 

यावर दुसरा उपाय म्हणजे तुम्ही तुमचं वजन कमी करा. वजन कमी करण्यासाठी सर्वातआधी तुम्ही आहारातून मिठ आणि गोड कमी करा. तसेच वजन कमी करण्यासाठी तीन आणखी गोष्टी फॉलो करा.

1) रोज एक्सरसाइज किंवा योगाभ्यास करा

2) सायंकाळी किंवा सकाळी किमात 6 ते 8 किलोमीटर पायी चाला.

3) शारीरिक संबंधाची फ्रीक्वेन्सी हळूहळू वाढवा,

या गोष्टी फॉलो करून तुम्ही तुमची समस्या दूर करू शकता आणि तुमचा परफॉर्मन्सही सुधारू शकता. तसेच तुम्ही धुम्रपान करत असाल तर वेळीच बंद करा. त्यामुळेही तुम्हाला ही समस्या होऊ शकते. 


Web Title: Sexual Life: I get tired very fast while doing sex what shall i do? api