शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

वाईचे विश्वकोश जगभरातील मराठी भाषिकांचा मानबिंदू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:13 IST

कोशीय लेखन हे भाषेच्या अस्तित्वाचा प्रधान आणि मूलभूत पाया असतो. भाषेला व्यवहार भाषा, मातृभाषा आणि लोकभाषा म्हणून जे एक ...

कोशीय लेखन हे भाषेच्या अस्तित्वाचा प्रधान आणि मूलभूत पाया असतो. भाषेला व्यवहार भाषा, मातृभाषा आणि लोकभाषा म्हणून जे एक अस्तित्व असते, ते ज्ञानभाषा म्हणून परिवर्तित व्हायला कोशीय लेखनाचीच जोड लागते. याच मुख्य प्रेरणेने यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची उभारणी केली. मराठी विश्वकोश हा त्यातील एक बृहद प्रकल्प होय. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी या प्रकल्पाचे सारथ्य केले. मराठी माणसाला सर्वस्तरीय ज्ञान आणि माहिती मराठी भाषेतून मिळावी आणि त्यायोगे भाषा समृद्ध व्हावी हा त्यामागे महत्त्वाचा उद्देश होता. १९६० च्या दशकापासून सुरू असणाऱ्या या प्रकल्पाचे २० संहिता खंड प्रकाशित झाले आहेत.

भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये ज्या २२ भाषांचा उल्लेख आहे, त्या भाषांत मराठी विश्वकोशासारखे सर्वसमावेशक, सर्वविषयक संग्राहक आणि परिभाषायुक्त कार्य झालेले नाही. तर्कतीर्थांनी वैश्विक स्तरावर मान्यताप्राप्त असणाऱ्या एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका या कोशग्रंथाच्या धरतीवर मराठी विश्वकोशाची निर्मिती केली आहे.

तर्कतीर्थांनंतर मे. पु. रेगे, रा. ग. जाधव, श्रीकांत जिचकार, विजया वाड यांनी मराठी विश्वकोशाच्या निर्मितीमध्ये विशेष योगदान दिले. विजया वाड यांनी शेवटच्या ३ खंडांचे कार्य मोठ्या गतीने करवून घेतले. वाड यांच्याच प्रयत्नातून माहिती तंत्रज्ञानाच्या बाबतीत विश्वकोश अधिक लोकाभिमुख झाला. १९६० च्या दशकापासून गेली सहा शतके विश्वकोश निर्मिती मंडळाचे हे कार्य सुरू आहे.

चौकट :

साताऱ्यातील शाहूपुरीमध्ये मराठी साहित्य परिषद शाखा सुरू झाल्यानंतर मराठी भाषा दिन, महाराष्ट्रातील पहिला मराठी भाषा पंधरवडा, लेखक तुमच्या भेटीला, मराठी वाङ्मय मंडळ असे उपक्रम सुरू झाले. शाहूपुरी शाखेने साहित्याच्या व्यासपीठावरून सामाजिक कार्यास मदत देऊन नवीन पायंडा पाडला. आजच्या युवा पिढीपर्यंत साहित्य पोहचणे गरजेचे आहे. त्यामुळे नवीन साहित्यिक तयार होण्यास मदत होईल. या संकल्पनेतूनच शाखेने रयत शिक्षण संस्थेबरोबर तीन वर्षांचा सामंजस्य करार केला.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी मसाप, शाहूपुरी शाखेने पुढाकार घेतला. मसाप कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, सातारा जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडहिकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मराठीला अभिजातचा दर्जा मिळावा यासाठी मसापचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी लढा हाती घेतला. पंतप्रधान कार्यालयाला एक लाख पत्रे पाठवण्यात आली.

दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर प्रार्थना करून आंदोलकांद्वारे सातारकरांचा आवाज दिल्लीत घुमला. या प्रार्थना आंदोलनाची दखल घेऊन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मराठीला अभिजात दर्जा लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.

-पी. एस. भिलारे (वाई)