शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

युवकांची स्टंटबाजी पादचाऱ्यांच्या जीवावर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:53 IST

सातारा : सातारा शहरातील राजपथावर रात्रीच्या सुमारास युवकांकडून दुचाकीवर बसून स्टंटबाजी सुरू असते. यामुळे अपघात होऊ लागले आहेत. पोलिसांनी ...

सातारा : सातारा शहरातील राजपथावर रात्रीच्या सुमारास युवकांकडून दुचाकीवर बसून स्टंटबाजी सुरू असते. यामुळे अपघात होऊ लागले आहेत. पोलिसांनी अशा हुल्लडबाजांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

राजपथावर रात्री नऊनंतर काही युवक दुचाकी बेफामपणे चालवत येत असतात. तसेच हॉर्नचाही कर्णकर्कश आवाज करतात. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तसेच अपघातही घडत असतात. अशा हुल्लडबाज युवकांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. तसेच रात्री साडे दहापर्यंत काही ठिकाणी तरी पोलिसांची नियुक्ती करावी, म्हणजे संबंधितांवर कारवाई करता येईल, अशी मागणी होत आहे.

................................................

महाबळेश्वरवाडीमधील बंधाऱ्यात पाणीसाठा

लोकमत न्यूज नेटवर्क

वरकुटे मलवडी : माण तालुक्यातील महाबळेश्वरवाडी परिसरातील बंधाऱ्यात मुबलक पाणीसाठा आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना फायदा होत आहे. गेल्यावर्षी महाबळेश्वरवाडी परिसरात सतत पाऊस सुरू होता. सततच्या पावसामुळे गावातून जाणाऱ्या ओढ्यावरील सर्वच बंधारे भरलेले होते. या बंधाऱ्यातील पाण्यावर पिके अवलंबून असतात. पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने पिकांना फायदा होणार आहे.

................................................

ऊसतोडणीला वेग

लोकमत न्यूज नेटवर्क

पुसेगाव : साताऱ्यासह बाहेरील जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू होऊन तीन महिने झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांत सध्या वेगाने ऊसतोड सुरू असल्याचे दिसत आहे. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होतो. सद्यस्थितीत अनेक कारखाने अजूनही सुरू आहेत. त्यामुळे अनेक गावांत ऊसतोड मजुरांच्या खोपी दिसू लागल्या आहेत. तसेच शिवारात मजूर ऊसाची तोडणी करीत आहेत. ऊसतोडणीला वेग आल्याचे दिसून येत आहे.

....................................................

घंटागाड्यांना उशिर

सातारा : सातारा शहरातील कचरा घंटागाड्यातून नेला जात आहे. पण, अनेक भागात घंटागाड्या उशिरा पोहोचत आहेत. त्यामुळे नागरिकांना वाट पाहत थांबावे लागत आहे. शहरातील सर्वच पेठांतील कचरा घंटागाड्यांतून नेण्यात येतो. दररोज सकाळी कचरा नेण्यात येतो. पण, मंगळवारपेठेत तर सकाळी ११ नंतर घंटागाडी येते.

........