मायणी : मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गावर मायणीनजीक कार-दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात प्रवीण शामराव थोरात (वय २५, रा. राहटणी, ता. खटाव) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मायणीजवळील खराब रस्त्याने घेतलेला हा तिसरा बळी आहे. घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गावर मायणी पक्षी अभयारण्यानजीक खराब रस्त्यावरील खड्डे मुजविण्यासाठी खडी टाकली आहे. रात्री पावणेनऊच्या सुमारास खडी व खड्डे चुकविताना समोरून येत असलेल्या कारला प्रवीण थोरात याच्या दुचाकीची धडक बसली. यात प्रवीण थोरात जागीच ठार झाला. मायणी पोलीस दूरक्षेत्रात याची नोंद झाली आहे. खराब रस्त्यामुळे याच महिन्यात दोघांना जीव गमवावा लागला होता. तसेच आजवर अनेकजण किरकोळ जखमी झाले आहेत. (वार्ताहर)
कार-मोटारसायकल धडकेत युवक ठार
By admin | Updated: November 22, 2015 00:02 IST
मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्ग : मायणीजवळ खराब रस्त्याने घेतला तिसरा बळी
कार-मोटारसायकल धडकेत युवक ठार
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}