नारायणवाडी येथे तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 05:15 IST2021-02-28T05:15:26+5:302021-02-28T05:15:26+5:30

कऱ्हाड : नारायणवाडी (ता. कऱ्हाड) येथे एका तरुणाचा मृतदेह आढळला आहे. अमोल जगन्नाथ पाटील (वय ३०, रा. चपणे मळा, ...

Youth commits suicide at Narayanwadi | नारायणवाडी येथे तरुणाची आत्महत्या

नारायणवाडी येथे तरुणाची आत्महत्या

कऱ्हाड : नारायणवाडी (ता. कऱ्हाड) येथे एका तरुणाचा मृतदेह आढळला आहे. अमोल जगन्नाथ पाटील (वय ३०, रा. चपणे मळा, काले) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी कऱ्हाड ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. त्याने टॉवेलने गळफास घेतल्याचे प्रथमदर्शनी समोर येत असल्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र डांगे यांनी सांगितले.

याबाबतची माहिती अशी की, अमोल पाटील याचे नांदगाव येथे गॅरेज आहे. शुक्रवारी सकाळी नारायणवाडी परिसरात त्याचा मृतदेह आढळला. तेथेच त्याची दुचाकीही उभी होती. पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र डांगे यांनी घटनास्थळी येत पाहणी केली. अमोलचा मृतदेह विच्छेदनासाठी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आला आहे. दरम्यान, घटनास्थळावरील परिस्थितीवरून अमोलने टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

Web Title: Youth commits suicide at Narayanwadi