शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

उंब्रजच्या सरपंचपदी योगराज जाधव विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:52 IST

उंब्रज ग्रामपंचायत निवडणुकीत १७ जागांपैकी राष्ट्रवादी, राष्ट्रीय काँग्रेस पुरस्कृत सह्याद्री उंब्रज विकास आघाडीने १३ जागा मिळवून बहुमत मिळवले होते. ...

उंब्रज ग्रामपंचायत निवडणुकीत १७ जागांपैकी राष्ट्रवादी, राष्ट्रीय काँग्रेस पुरस्कृत सह्याद्री उंब्रज विकास आघाडीने १३ जागा मिळवून बहुमत मिळवले होते. राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गटातील भैरवनाथ जनविकास परीवर्तन पॅनलला २ जागा मिळाल्या होत्या. भाजप पुरस्कृत भैरवनाथ ग्रामविकास पॅनलने २ जागा जिंकल्या. सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर सर्वसाधारण पुरुष प्रवर्गासाठी जाहीर झाले. उंब्रजच्या सरपंचपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे सर्व उंब्रजकरांचे लक्ष लागले होते. ८ फेब्रुवारीला सरपंचपदाची निवड उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १६ फेब्रुवारीपर्यंत स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर २३ फेब्रुवारीला निवडणूक घेण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले. सोमवारी सरपंच व उपसरपंचपदाची निवड झाली.

सह्याद्री उंब्रज विकास आघाडीच्या वतीने योगराज जाधव यांनी सरपंचपदासाठी अर्ज भरला, तर याच आघाडीतील सुधाकर जाधव यांनीही सरपंचपदासाठी अर्ज भरला. उपसरपंचपदासाठी सुनंदा जाधव यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे उपसरपंचपदाची निवड बिनविरोध झाली. मात्र सरपंचपदासाठी दोन अर्ज दाखल झाल्यामुळे मतदान घेण्याची सूचना सर्व सदस्यांनी अध्यासी अधिकारी विकास शिंदे यांना केली.

सरपंचपदासाठी झालेल्या मतदानामध्ये योगराज जाधव यांना सतरापैकी पंधरा मते मिळाली. सुधाकर जाधव यांना दोन मते मिळाली. त्यामुळे योगराज जाधव यांना सरपंच म्हणून विजयी घोषित करण्यात आले. निवडणूक अध्यासी अधिकारी म्हणून विकास शिंदे, सहायक अध्यासी अधिकारी संदीप काळे, सचिव म्हणून ग्रामविकास अधिकारी व्ही. एम. चव्हाण यांनी काम पाहिले.

फोटो : २४योगराज जाधव

फोटो : २४सुनंदा जाधव