शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

मकरंद पाटलांसह ३१ जणांवर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा

By admin | Updated: October 16, 2014 22:49 IST

कोंढवली मारामारी : पोलीस अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट

वाई : विधानसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी कोंढवली, ता. वाई येथील मारामारीप्रकरणी मकरंद पाटील व त्यांच्या ३१ समर्थकांवर गुन्हा दाखल झाला आहे. विकास शिंंदे यांनी याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. कोंढवली येथील काशिनाथ मारुती चोरट यांच्या घराशेजारी हातात तलवार, लोखंडी गज, लाकडी दांडके घेऊन बेकायदा जमाव जमवून विकास शिंदे यास ‘तू काँग्रेस पक्षाचे काम का करतोस,’ असे म्हणून चिडून जाऊन राष्ट्रवादी पक्षाचे मकरंद पाटील, विक्रम ऊर्फ भैय्या डोंगरे, योगेश रासकर, गणेश कदम, नितीन चौधरी, रोहित कचरे, सोनू जायगुडे (सर्व रा. वाई), विलास देशमुख (रा. सोळशी, ता. कोरेगाव), बंटी नारायण जाधव, अभिजित प्रमोद जाधव, योगेश जाधव, अक्षय किरण जाधव (सर्व रा. भुर्इंज), वीरेंद्र जाधव (रा. अनपटवाडी), रोहित मारुती वाडकर (रा. वाडकरवाडी), राजेंद्र गोविंंद धनावडे (रा. मांढरेवाडी, ता. वाई), प्रमोद मारुती जाधव, सचिन सहदेव गोळे (दोघे रा. वेलंग), रमेश सीताराम रावडे (रा. मुगाव), चंद्रकांत बबन सणस (रा. आसरे) यांनी व अनोळखी १२ लोकांनी लाकडी दांडक्याने, सळईने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यात प्रवीण जयवंत वरे (रा. कुसगाव), समीर उत्तम जाधव (रा. वेलंग), किसनराव तुकाराम चिरगुटे (रा. मुगाव), राजेंद्र अर्जुन पाटील (रा. बावधन नाका, वाई), किरण नितीन शेलार (रा. एकसर) यांना मारहाण करून दुखापत केली. तसेच इंडिगो कार (एमएच ११ एके ९६१२), टोयाटो इनोव्हा (एमएच ११ बीएच ४२५४), मारुती सुझुकी (एमएच ११ बीएच ७२१२), तवेरा (एमएच ११ एडब्ल्यू ५३९२), फियास्टा (एमएच ११ एडब्ल्यू २०११) व विकास शिंदे यांची नवीन पांढऱ्या रंगाची टोयाटो फॉर्च्युनर कार या सहा वाहनांचे सुमारे ३० लाखांचे नुकसान केल्याचे शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. (प्रतिनिधी)