अवैध दारु व्यवसायाविरोधात महिलांचा एल्गार

By Admin | Updated: December 4, 2014 23:38 IST2014-12-04T22:36:32+5:302014-12-04T23:38:21+5:30

गावांत अवैध दारू व्यावसायिकांनी धुमाकूळ--प्रशासनाच्या ढोंगी कारभारामुळे राजरोसपणे दारुधंदेवाल्यांनी हैदोस घातला

Women's ElGar against illegal liquor business | अवैध दारु व्यवसायाविरोधात महिलांचा एल्गार

अवैध दारु व्यवसायाविरोधात महिलांचा एल्गार

मल्हारपेठ : ठोमसे गावातील अवैध दारूधंदे बंद करण्यासाठी गावातील महिला कार्यकर्त्यांची बैठक घेऊन उंब्रज पोलिसांत तत्काळ कारवाई करण्यासाठी सुमारे १२५ ग्रामस्थांसह महिलांच्या सध्याचे निवेदनाद्वारे बंदीची मागणी केली.
गेली अनेक दिवस ठोसे (ता. पाटण) येथील गावांत अवैध दारू व्यावसायिकांनी धुमाकूळ घातला आहे. राजकीय पुढारी व पोलीस प्रशासनाच्या ढोंगी कारभारामुळे राजरोसपणे दारुधंदेवाल्यांनी हैदोस घातला आहे. अनेक तरूण व्यसनांच्या आहारी गेल्यामुळे तरुणाई बरबाद होण्याच्या मार्गावर आहे. महाराष्ट्र शासनाने क्रांतिकरी निर्णय घेऊन गावा-गावातील हातभट्टी हद्दपार केली. परंतु काही दिवसांतच या हातभट्टीची जागा देशी-विदेशी दारूनी घेतली. एरव्ही १० ते १५ रुपयांना मिळणाऱ्या हातभट्टीचे रुपांतर देशी-विदेशीच्या महागड्या दारुने घेऊन तळीरामांना ५० रुपये किंमतीची दारू परवडते कशी, असा सवाल उपस्थित होत आहे.
वारंवार दारुबंदीसाठी महिलांसह ग्रामस्थांनी आवाज उठवूनही गावातील राजकीय पुढाऱ्यांसह पोलिसांच्या सहकार्यामुळेही चळवळ यशस्वी झाली नाही. उत्पादन शुल्क खात्याने वारंवार छापे टाकून जुजबी कारवाई करूनप हात वर केले.
अलिकडे मात्र या धंद्याने भेसूर रूप धारण केले आहे. यामुळे महिलांसह युवक एकत्र येऊन दारूधंद्याचे उच्चाटन करण्यासाठी त्या बैठकीत कणखर निर्णायक भुमिका घेऊन निर्णय घेण्यात आला. सुमारे सव्वाशे महिला व ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन उंब्रज पोलिसांना देण्यात आले.
दरम्यान अगोदरच्या रात्री गावांमध्ये दोन महिलांना त्यांच्या रात्री गावांमध्ये दोन महिलांना त्यांच्या नवऱ्यांनी ऐनरात्री घराबाहेर काढून मारहाण केली. रात्रभर त्यांना घराबाहेर बसावे लागल्याने ही बातमी कळताच संबंधित महिलांनी तत्काळ या निवेदनासह उंब्रज पोलीस ठाण्यात धाव घेतली व दारुबंदीसाठी निवेदन देण्यात आले. यामुळे ठोमसे गावातील उभी बाटली आडवी होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. खरोखरच दारू व्यवसायिकांवर कारवाई होणार का ? याविषयी महिलांनी पुढाकार घेतल्यामुळे चर्चेचा विषय झाला आहे. संबंधितांवर कारवाई करून सहकार्य करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Women's ElGar against illegal liquor business