म्हैस आडवी आल्याने दुचाकीवरील महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:43 IST2021-09-27T04:43:21+5:302021-09-27T04:43:21+5:30

सातारा : रस्त्यात अचानक म्हैस आडवी आल्याने दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात रहिमतपूर ते ...

Woman on two-wheeler dies after buffalo falls horizontally | म्हैस आडवी आल्याने दुचाकीवरील महिलेचा मृत्यू

म्हैस आडवी आल्याने दुचाकीवरील महिलेचा मृत्यू

सातारा : रस्त्यात अचानक म्हैस आडवी आल्याने दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात रहिमतपूर ते घाटामाथा रस्त्यावर दि. २४ रोजी रात्री १० वाजता झाला.

शैला रामदास घाडगे (वय २७, रा. औंधरोड, रहिमतपूर, ता. कोरेगाव) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शैला घाडगे या त्यांचा मुलगा आकाश घाडगे याच्या दुचाकीवरून रहिमतपूर ते घाटामाथा जाणाऱ्या रस्त्यावरील पवारवाडी येथे पुलाजवळ अचानक म्हैस आडवी आली. त्यामुळे दुचाकी घसरली. यात शैला या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तत्काळ औंध येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताची रहिमतपूर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

Web Title: Woman on two-wheeler dies after buffalo falls horizontally