शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

99th Marathi Sahitya Sammelan: शाहू महाराजांवर संशोधनात्मक लेखन करणार - विश्वास पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 17:03 IST

माहिती न घेणाऱ्यांमुळे वातावरण बिघडते

छत्रपती थोरले शाहू महाराज साहित्यनगरी सातारा : साताऱ्याचे थोरले शाहू महाराज आणि दुसरे प्रतापसिंह महाराज हे दोन महाराज माझे फार आवडते आहेत. थोरले शाहू महाराजांवर संशोधनात्मक लेखन करणे हे माझे कर्तव्य असून ते मी पूर्ण करेन, असा विश्वास साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप समारंभात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, ‘मराठी भाषा, संस्कृती आणि मराठी माणूस टिकावा, वाढवा आणि समृद्ध व्हावा, यासाठी आपण वेगळा विचार करायला हवा. आपल्या वापरात ही भाषा आवर्जून राहील, याचा कटाक्ष मराठी माणसाने ठेवावा. आपण साहित्यिक आणि सहिष्णू पद्धतीने ही लढाई लढत आहोत, पण गरज पडली, तर मायमराठीसाठी मराठी माणूस रस्त्यावर उतरून लढू शकतो, हे दाखवून दिले आहे.

वाचा: ‘लोकमत’च्या वृत्तानंतर संमेलनाध्यक्षांच्या पत्नीचा सन्मान!, समारोप सोहळ्यात व्यासपीठावर स्थान

मराठी माणसाच्या जिव्हाळाचा विषय असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे पिता शहाजी महाराज यांची समाधी कर्नाटकात आहे. तिची अवस्था फार वाईट आहे. त्यासाठी ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दाखविली आहे. कोट्यवधी खर्च करून छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे आपण बांधतो, पण त्यांच्या पित्याच्या समाधीची दुरवस्था होणे ही लाजिरवाणी बाब असल्याची खंत पाटील यांनी व्यक्त केली.

माहिती न घेणाऱ्यांमुळे वातावरण बिघडते

छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याविषयी लिहिताना, बोलताना मी प्रचंड अभ्यास केलेला असतो, पण हल्ली लोक त्यावर व्यक्त होताना कोणतीही माहिती न घेता उगाच बडबडत असतात. त्यामुळे वातावरण बिघडते. छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अनेक साहित्यकृतीतून विष पसरवले गेले होते. ही परिस्थिती बदलण्यासाठी शिवाजी सावंत यांची ‘छावा’ आणि माझी ‘संभाजी’ ही कादंबरी महत्वाची ठरली. आमच्या या योगदानाची कोणी दाखल घेणार आहे की नाही? असा सवालही विश्वास पाटील केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Vishwas Patil to write research-based book on Shahu Maharaj.

Web Summary : Vishwas Patil pledges research on Shahu Maharaj at Sahitya Sammelan. He stressed Marathi preservation and criticized neglect of Shahaji Maharaj's tomb, urging informed discourse.