शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

नागरी वस्तीत रानगव्यांचा वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:12 IST

खंडाळा : तालुक्यातील कोपर्डे गावच्या हद्दीत काही शेतकऱ्यांना रानगव्यांचा कळप दिसून आला. येथील राखीव वनक्षेत्रातून हे रानगवे गावशिवारात आल्याने ...

खंडाळा : तालुक्यातील कोपर्डे गावच्या हद्दीत काही शेतकऱ्यांना रानगव्यांचा कळप दिसून आला. येथील राखीव वनक्षेत्रातून हे रानगवे गावशिवारात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन्यप्राण्यांचा नागरी वस्तीतील शिरकाव हा चिंतेचा विषय बनला आहे.

कोपर्डे गावच्या शिवाराशेजारी डोंगरालगत राखीव वनक्षेत्र आहे. त्यामुळे येथे जंगली प्राण्यांचा नेहमीच वावर दिसून येतो. लांडगे, तरस, कोल्हे, ससे, रानडुक्कर, हरीण यासह अनेक वन्यप्राणी येथे आढळून येतात. मात्र, काही दिवसांपासून गावशिवारात रानगवे दिसून आल्याने आश्चर्यासह भीती व्यक्त केली जात आहे. वास्तविक या डोंगरालगत गावकऱ्यांची शेती असल्याने शेतकामासाठी शेतकऱ्यांची नेहमीच ये-जा असते. गावातील शेतकरी अनिल बोडरे, मोहन बोळे यांसह काही तरुण धोम-बलकवडी कालव्यावरून जात असताना त्यांना गव्यांचा कळप दिसून आला. कळप ऊस आणि पेरूच्या बागेत घुसल्याने शेतकऱ्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले. या भागात शेतीच्या कामासाठी जाताना शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

फोटो : ०२ खंडाळा

खंडाळा तालुक्यातील कोपर्डे गावच्या हद्दीत रानगव्यांचा कळप दिसून आला.