वन्यजीव अभ्यासकांना पाटणच्या निसर्गाची भुरळ

By Admin | Updated: September 18, 2014 23:22 IST2014-09-18T22:35:45+5:302014-09-18T23:22:53+5:30

‘हरपिटॉलॉजी’ कार्यशाळा : देशभरातील चाळीस अभ्यासकांचा समावेश

Wildlife researcher's love for Patan's nature | वन्यजीव अभ्यासकांना पाटणच्या निसर्गाची भुरळ

वन्यजीव अभ्यासकांना पाटणच्या निसर्गाची भुरळ

पाटण : हरपिटोफॉवन म्हणजे साप, बेडूक, पाल, सरडे अशा वन्यजीवांच्या अभ्यासासाठी शनिवार दि. २७ पासून पाटण येथील बाळासाहेब देसाई महाविद्यालयात चार दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. कार्यशाळेसाठी देशभरातील ४० वन्यजीव अभ्यासक उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती प्राचार्य डॉ. एस. डी. पवार व प्रा. डॉ. बापूराव जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सातारा जिल्ह्याचा पश्चिम घाट निसर्गसंपदेने नटलेला आहे. झाडावेलींबरोबरच वन्यजीवांची वैविध्यता हे येथील वैशिष्ट्य आहे. विविध प्रकारचे सरपटणारे प्राणी येथे आढळतात. म्हणूनच पाटण तालुक्यातील जैवविविधेचे महत्त्व ओळखून येथे हरपिटोफॉवन राष्ट्रीय कार्यशाळा भरविण्याचे नियोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यशाळेत देशभरातील ४० वन्यजीव अभ्यासक सहभागी होणार आहेत.
साप, बेडूक, पाल, सरडे व सिसिलीयन या जाती नष्ट होत चालल्या आहेत. यावर निसर्गप्रेमी संशोधकांनी अभ्यास करावा म्हणून विद्यापीठ अनुदान आयोग व राजीव गांधी प्राणी संग्रहालय (सर्प उद्यान) कात्रज यांच्या सहयोगाने कार्यशाळा आयोजित केली आहे.
या कार्यशाळेत साप, बेडूक, सरडे, पाली, देवगांडूळ इत्यादी वन्यजीवांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच प्रत्यक्ष भेटीद्वारे अभ्यास केला जाणार आहे. यासाठी सर्प उद्यानाचे संस्थापक नीलमकुमार खैरे, अशोक कॅप्टन, डॉ. वरद जोशी, अनिल खैरे, डॉ. डी. बी. कदम, केदार भिडे, डॉ. एच. व्ही. घाटे, डॉ. अनिल पाध्ये, डॉ. अनिरुद्ध जोशी, दीपक सावंत, राजन शिर्के, विशाल प्रसाद मार्गदर्शन करणार आहेत. भारतीय हरपिटॉलॉजिकल सोसायटीचे चेअरमन अनिल खैरे यांचेही या कार्यशाळेस योगदान लाभले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Wildlife researcher's love for Patan's nature