शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

‘गृहराज्यमंत्र्यांचा पीए’ म्हणून पोलिसांशी बोलणारा ‘तो’ कोण?

By admin | Updated: November 28, 2015 00:22 IST

भाजपची चौकशीची मागणी : ‘बीफ’चा ट्रक सोडण्यासाठी बनाव

लोहोम : ‘बीफ’ घेऊन चाललेला ट्रक सोडून द्यावा, संबंधितांवर कारवाई करू नये,’ असा फोन एका व्यक्तीने शिरवळ पोलिसांना केला. ‘मी गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांचा स्वीय सहायक बोलतोय,’ असे सांगणारा तो तोतया असल्याचे स्पष्ट झाले असून, ‘तो’ कोण होता याचा पोलिसांनी शोध घ्यावा, अशी मागणी भाजपने केली आहे.बनावट कागदपत्रांच्या आधारे ‘बीफ’ विक्री करणारे रॅकेट कार्यान्वित असून, शिरवळ हद्दीत पकडलेला दहा टनी ट्रक हा त्याचाच भाग होता, असा आरोप भाजपचे जिल्हा सरचिटणीस अनुप सूर्यवंशी यांनी पत्रकाद्वारे केला आहे. शिरवळच्या पोलीस निरीक्षकांना एका व्यक्तीने फोन करून आपण प्रा. शिंदे यांचा स्वीय सहायक असल्याचे सांगितले. ‘या प्रकरणात लक्ष घालू नका. गाडी सोडून द्या, कारवाई करू नका,’ असे त्या व्यक्तीने सांगितले. तथापि, चौकशी केली असता, हा स्वीय सहायक नसल्याचे समोर आले; त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले असल्याचे सूर्यवंशी यांनी म्हटले आहे.इचलकरंजी येथून एका ‘बीफ’ पुरवठादार एजन्सीने अशा प्रकारे अनेकदा ‘बीफ’चा पुरवठा केला आहे, असा आरोप करून सूर्यवंशी यांनी म्हटले आहे की, एजन्सीच्या माध्यमातून परदेशी व्यापाराच्या बाबतीत काही अनियमितता आहे का, अशा किती एजन्सी बनावट व बेकायदा कागदपत्रांच्या आधारे व्यवहार करीत आहेत, याची चौकशी व्हावी, अशी मागणी सूर्यवंशी यांच्यासह भाजपचे खंडाळा तालुकाध्यक्ष राहुल हाडके, निखिल झगडे, चिराल चव्हाण, प्रशांत रेवडीकर, राहुल राऊत, सागर जरांडे, केदार हाडके आदींनी केली आहे. (वार्ताहर)मांस वाहतूकप्रकरणी तिघांना कोठडीशिरवळ : मांस वाहतूकप्रकरणी अटक करण्यात आलेल्या समीर दिलावर मुजावर (वय ३८), शकील इब्राहिम पटवेकर (वय ५७, दोघेही रा. इस्लामपूर ता. वाळवा जि. सांगली) व समीर दिलावर इबुशे (रा. इस्लामपूर) यांना न्यायालयाने शुक्रवारी दि. ३० पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.