शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

बोरणे घाटात सेल्फी काढताना पुण्याची तरुणी दरीत पडली

By दत्ता यादव | Updated: August 3, 2024 23:05 IST

रुग्णालयात उपचार सुरू; तातडीने मदतकार्य घेतले हाती.

दत्ता यादव, लोकमत न्यूज नेटवर्क |

सातारा : सातारा-ठोसेघर रस्त्यावरील बोरणे घाटात गाडी उभी करून सेल्फी काढत असताना तोल जाऊन पुण्यातील २९ वर्षांची तरुणी पन्नास फूट खोल दरीत पडली. यामध्ये संबंधित तरुणी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडली.

नसरीन अमीर कुरेशी (वय २९, रा. वारजे, पुणे), असे दरीत पडून जखमी झालेल्या तरुणीचे नाव आहे. साताऱ्यातील संगमनगरमध्ये पुण्यातील दोन मुली व तीन मुले चारचाकीने आले होते. त्यानंतर दुपारी सर्वजण ठोसेघरला फिरण्यासाठी गेले होते. परंतु ठोसेघर धबधबा बंद असल्याने सर्वजण परत यायला निघाले. बोरणे घाटात आल्यानंतर सर्वजण गाडीतून खाली उतरले. त्यानंतर फोटोसेशन सुरू झालं. रस्त्याच्याकडेला उभे राहून फोटो काढत असताना अचानक तोल गेल्याने तरुणी पन्नास फूट खोल दरीत पडली. याची माहिती त्या मुलांनी सातारा तालुका पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी होमगार्ड तसेच शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्सच्या जवानांना याची माहिती दिली. पोलिस तसेच ट्रेकर्स आणि होमगार्डच्या जवानांनी तातडीने बोरणे घाटात जाऊन मदतकार्य सुरू केलं. होमगार्ड अभिजित मांडवे यांनी दरीत उतरून तरुणीला दोरीच्या साह्याने सेफ्टी बेल्ट लावून दरीतून बाहेर काढले. संबंधित तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिला तातडीने साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, अतिदक्षता विभागामध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत. सातारा तालुका पोलिस ठाण्यात या घटनेची अद्याप नोंद झाली नव्हती.

फोटोच्या धुंदीत जातोय ‘तोल’बोरणे घाट किंवा कास रस्त्यावरील घाटात जाताना अनेक पर्यटक आपल्या गाड्या थांबवून रस्त्याच्या कट्ट्यावर उभे राहून सेल्फी घेताना किंवा एकमेकांचे फोटो काढताना दिसतात. या पर्यटकांवर आता कारवाई होणे गरजेचे आहे. फोटोच्या धुंदीत कधी पाय घसरतो, हे समजतही नाही. ठोसेघर अथवा वजराई धबधबा परिसरात बंदी असतानाही अनेक पर्यटक हुल्लडबाजी करताना पोलिसांना दिसून येत आहेत. आतापर्यंत दोन पर्यटकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, तरी सुद्धा पर्यटकांची हुल्लडबाजी सुरूच आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर