शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यातील डीपी बोले तो ‘डेथ पास’!

By admin | Updated: October 30, 2015 23:40 IST

गल्लोगल्ली मृत्यूचा सापळा : मांजा काढताना विजेचा झटका बसल्याने विद्यार्थी जखमी तरीही फ्युजपेट्या उघड्याच

सातारा : वाढलेली झाडी, कचरा कुंडी म्हणून होणारा वापर, मृत जनावरे आणून टाकण्याचे ठिकाण म्हणून अलीकडे डीपी बॉक्स ठेवलेल्या जागांचा वापर होताना दिसत आहे. वीजवितरण कंपनीच्या अक्षम्य दुर्लक्षमुळे गेल्या काही दिवसांत हे डीपी मृत्यूचा शॉर्टकट ‘आ’ वासून उभे असल्याचे धक्कादायक वास्तव शहरात पाहायला मिळाले. डीपी म्हणजे मृत्यूच्या जवळ नेणारे ‘डेथ पास’ असे म्हणण्याची वेळ सातारकरांवर आली आहे. मंगळवारी शहरातील मंगळवार तळे परिसरात सोमनाथ ढेबे या प्रतापसिंह हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या मुलाला विजेचा धक्का बसल्याने तो गंभीर स्वरूपात जखमी झाला. त्यामुळे पुन्हा एकदा शहरातील डीपी आणि सामान्यांची सुरक्षितता याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या परिसरातील नागरिकांच्या मते, गेल्या अनेक महिन्यांपासून येथील डीपीचे दार लावण्याचीही तसदी कोणी घेत नव्हते. या पार्श्वभूमीवर सातारा शहरातील विविध भागांतील डीपींची अवस्था पाहताना अंगावर शहारे आले. कोणत्याही सुरक्षा यंत्रणेशिवाय वीजवितरण कंपनीने या डीपींची उभारणी केली आहे. शालेय वयात मुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर खोडकरपणा असतो. आपल्या मित्रांमध्ये आपण ‘हिरो’ ठरावे, यासाठी त्यांची धडपड असते. त्यामुळे पालकांनीही मुलांना धोक्याची समज देणे आवश्यक आहे. नित्यनियमाने मुलांचे होणाऱ्या अपघातांविषयी घरात मुलांशी चर्चा होणे आवश्यक असते. हा अपघात का घडला, त्यातील धोके काय होते, ते कसे टाळता आले, असते याविषयी जेवतानाही बोलणे शक्य आहे. घरांमध्ये मुलांना समजायला नको म्हणून अशा चर्चा होत नाहीत, त्यामुळे पुढील अनेक धोके संभवतात. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून कृती केल्यानंतर त्याचे होणारे परिणाम मुलांना सांगितले तर अनेक अपघात टाळता येऊ शकतात. पालकांनीही बोलते झाले पाहिजे. (प्रतिनिधी) चक्क जाहिरातींसाठी वापर सातारा शहरात जुना आरटीओ रस्त्यावर एक वीजवितरणचा डीपी आहे. त्यावर चक्क जाहिराती लावण्यात आल्या आहेत. दुकानात काही आणण्याच्या निमित्ताने फूटपाथवरून जाणाऱ्या चिमुरड्यांच्या हाताला हा डीपी सहज येतो. डीपी वर चिटकवलेल्या जाहिरातीचा कागद फाडण्याच्या नादात जर लहानग्यांनी त्याला हात लावला तर मोठा अनर्थ घडू शकतो, असे येथील स्थानिक सांगतात. त्यामुळे येथे जाहिराती चिटकविण्यापेक्षा धोक्याची सूचना लिहिण्यात यावी, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. उघड्या फ्युजपेट्या शहरातील बहुतांश फ्युजपेट्या पत्र्याच्या आहेत. त्यांना कडी-कोयंडा नाहीत. या पेट्यांचा वापर चित्रपटांचे पोस्टर, जाहिराती चिटकविण्यासाठी केला जात आहे. हे चिटकवत असताना मोठा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाला आहे. त्यामुळे या पेट्या बदलून त्याठिकाणी जाहिराती चिटकविण्यास मज्जाव करणे गरजेचे आहे, असे मत नागरिकांमधून व्यक्त केले जात आहे.