शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

नाट्य संमेलन आम्ही नाकारले नाहीच!

By admin | Updated: November 25, 2015 23:51 IST

सातारा शाखेचा दावा : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर काटकसरीचा होता प्रस्ताव; मैदानही केले होते आरक्षित

राजीव मुळ्ये ल्ल सातारादुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नाट्य संमेलन आयोजित करण्यास नाट्य परिषदेच्या सातारा शाखेने असमर्थता दर्शविली आणि ठाण्याचे नाव पक्के झाले, अशी चर्चा असली तरी आयोजनास नकार कधी कळविलाच नव्हता, अशी माहिती सातारा शाखेकडून देण्यात आल्याने चर्चेची दिशाच बदलली आहे. आम्ही काटकसरीने उत्तम संमेलन आयोजित करू, अशी ग्वाही सातारा शाखेने दिली होती आणि तयारीही सुरू केली होती, असेही सांगण्यात आले. गेली चार वर्षे सातारा शाखेकडून नाट्य संमेलनाचे यजमानपद मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केला जात आहे. २०११ मध्ये रत्नागिरी संमेलनात असे पत्र प्रथम देण्यात आले. नंतरची चार वर्षे या ना त्या कारणामुळे साताऱ्याला यजमानपद मिळू शकले नाही. त्यामुळे यावर्षी साताऱ्याचे नाव चर्चेत आघाडीवर होते. परंतु मध्यंतरी दोन वेळा दोन वेगवेगळ्या कारणांनी सातारा शाखा यजमानपदास अनुत्सुक असल्याच्या चर्चा माध्यमांमध्ये रंगल्या. विशिष्ट व्यक्ती अध्यक्षपदी असेल, तरच साताऱ्याला संमेलन घेऊ असे सातारा शाखेचे म्हणणे आहे, असे एक कारण सांगितले गेले. दुष्काळामुळे निधी संकलनात मर्यादा असल्याचेही कारण पुढे आले. परंतु कोणत्याही अटीविना, कोणत्याही परिस्थितीत आम्ही संमेलन घेण्यास तयार होतो, असे सातारा शाखेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस यांनी सांगितले.फेब्रुवारी महिन्यातील तीन दिवस नाट्य संमेलनासाठी जिल्हा परिषदेचे मैदान आरक्षित केले आहे आणि हे आरक्षण अजूनही रद्द केलेले नाही, असे सातारा शाखेचे म्हणणे आहे. तसेच यजमानपद साताऱ्याने नाकारले, असे नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेनेही कधी म्हटलेले नाही. ‘सातारा आणि नगरमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे ठाण्याला संमेलन घेण्याचा निर्णय झाला,’ असेच मध्यवर्ती शाखेने जाहीर केल्याचे चिटणीस यांनी नमूद केले. ‘राज्य शासनाकडून मिळणाऱ्या २५ लाखांच्या निधीव्यतिरिक्त २५ लाखांचा निधी स्थानिक पातळीवर उभारला जाईल आणि काटकसरीने संमेलन आयोजित केले जाईल, अशी ग्वाही सातारा शाखेने दिली होती. ही चर्चा संमेलनाध्यक्ष निवडीच्या आधी झाली होती; त्यामुळे आम्ही विशिष्ट व्यक्तीच्या नावाचा आग्रह धरल्याची चर्चाही चुकीची आहे,’ असे ते म्हणाले.  

शासनाच्या अनुदानाइतकीच रक्कम आम्ही उभी करू आणि देखणे संमेलन करू, अशी आमची भूमिका होती. मात्र संमेलनांचे सध्याचे स्वरूप पाहता एवढ्या निधीत ते होणार नाही, असे वाटल्याने साताऱ्याची संधी हुकली असावी. परंतु आम्ही नकार कळविला नाही, हे नक्की.- श्रीकांत देवधर, उपाध्यक्ष, सातारा शाखा 

पन्नास लाखांत संमेलन करून दाखवण्याची आमची जिद्द होती आणि आम्ही ते करू शकलो असतो. पूर्वीही नाट्य संमेलनासह अनेक संमेलने येथे झाली. त्यातून पैसे वाचवून वर्षभर उपक्रम राबविले गेले. परंतु यासाठी संमेलनातील झगमगाटाला फाटा देणे आवश्यक असते.- प्रा. शेखर कुलकर्णी, खजिनदार, सातारा शाखा 

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संमेलनासाठी स्थानिक पातळीवर निधी संकलनाला मर्यादा येणार, हे निश्चित होते; परंतु पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरून, अनावश्यक खर्चाला फाटा देऊन एक उत्तम संमेलन आयोजित करण्याची आमची संधी हुकली, याचे वैषम्य वाटते.- राजेश मोरे, कार्यवाह, सातारा शाखा