शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात फेब्रुवारीतच पाणी टंचाई; 'या' तालुक्यात टँकर सुरू  

By नितीन काळेल | Updated: February 21, 2025 18:32 IST

टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढणार असल्याने प्रशासनाला नियोजन करावे लागणार

सातारा : जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यातच टंचाई सुरू झाली असून माण तालुक्यातील सहा गावांसह वाड्यावस्त्यांना टॅंकर सुरू झाले आहेत. या टॅंकरवर १० हजारांहून अधिक लोकांची तहान अवलंबून आहे. तर लवकरच टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढणार असल्याने प्रशासनाला नियोजन करावे लागणार आहे.जिल्ह्यात गेल्यावर्षी वार्षिक सरासरीच्या अधिक पर्जन्यमान झाले होते. पण, माण तालुक्यातील काही भागात पाऊस कमी झाला होता. यामुळे पाऊस कमी झालेल्या भागात टॅंकर यंदा लवकर सुरू करावे लागतील असा अंदाज होता. हा अंदाज खरा ठरला आहे. कारण, यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच टंचाई निवारणासाठी टॅंकर सुरू करावे लागले आहेत. माण तालुक्यात यंदा लवकर टंचाई परिस्थिती उद्भवलीय. मागील चार दिवसांपासून माणमधील सहा गावांना आणि वाड्यावस्त्यांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तालुक्यातील मोही, धुळदेव, वरकुटे म्हसवड, कारखेल, हवालदारवाडी, जाशी या गावांना सध्या टॅंकर सुरू आहेत. माणमधील आणखीही काही गावांनी टॅंकरची मागणी केलेली आहे. त्यामुळे माण तालुक्यात टॅंकरची संख्या वाढणार आहे.

६७ वाड्यांना ही झळ..माण तालुक्यात ६ गावे टंचाईग्रस्त आहेत. तसेच त्या अंतर्गत ६७ वाड्यांना ही टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तालुक्यातील सध्या १० हजार १३२ नागरिकांना टॅंकरच्या पाण्याचा आधार आहे.

९ हजार पशुधन ही बाधित..माणमध्ये पाणी टंचाईने नागरिक बाधित आहेत. तसेच पशुधनालाही पाणी मिळणे अवघड झालेले आहे. सध्या टंचाईग्रस्त गावातील ९ हजार ७० पशुधनाला टॅंकरच्या पाण्याचा आधार आहे.

८ टॅंकर सुरू..जिल्ह्यात गेल्यावर्षी मार्च महिन्याच्या मध्यावर टंचाई निवारणासाठी टॅंकर सुरू झाले होते. यंदा मात्र, फेब्रुवारीतच सुरूवात झाली आहे. माणमध्ये सध्या ८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय. हे सर्व टॅंकर शासकीय आहेत. या टॅंकरना दररोज २९ खेपा मंजूर आहेत. तसेच टंचाईच्या गावात ३ विहिरी आणि एका बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणीTemperatureतापमान