शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

सव्वा तपापासून जलवाहिनीला गळती

By admin | Updated: August 13, 2015 22:45 IST

विद्यानगर वसाहत : दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा नागरिकांचा आरोप

सातारा : शहरात अनेक आंदोलने हे पाण्यासाठी होतात. कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, अपुरा पाणीपुरवठा अशा अनेक कारणांना संबंधित विभागाला तोंड द्यावे लागते; परंतु येथील औद्योगिक वसाहतीमध्ये याला अपवादात्मक गोष्ट म्हणजे येथील पाण्याच्या टाकीला पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला एक-दोन नव्हे, तर तब्बल १५ वर्षांहून अधिक काळापासून गळती लागली आहे. या गळतीमुळे परिसरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा नागरिकांमधून बोलले जात आहे. कोडोली येथील गणेश चौकाजवळील विद्यानगर वसाहतीतून औद्योगिक वसाहतीच्या जलटाकीत पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला ही गळती लागली आहे. ही जलवाहिनी जवळपास अडीच फूट व्यासाची असून, विद्यानगर येथील वसाहतीमध्ये या वाहिनीला दोन ठिकाणी वळविण्यात आल्याने येथे सतत पाण्याचा दाब असतो. त्यामुळे येथे नेहमी गळती लागलेली असते. ज्या ठिकाणी ही गळती लागली आहे, त्या ठिकाणी मोठे डबके झाले असून, शेजारहून सांडपाण्याचा नालाही या डबक्यातूनच जात आहे. त्यामुळे जलवाहिनीचे पाणी अन् सांडपाणी एकत्र मिसळत असून, हेच पाणी येथील वाहणाऱ्या ओढ्यात जात आहे. या जलवाहिनीला चोवीस तास पाणीपुरवठा होत असल्याने प्राधिकरणाचे लाखो लिटर पाणी येथून वाया जात आहे. हे सर्व पाणी ओढ्यात जात असल्याने प्राधिकरणाचे लाखो रुपये पाण्यात जात असल्याचे येथील नागरिक सांगत आहेत.दरम्यान, जलवाहिनी सांडपाणी वाहणाऱ्या गटारीला चिटकून आहे. सांडपाणी व गळती लागलेल्या जलवाहिनीतील पाणी मिश्रित होत असून, येथील नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार येथील नागरिकांनी केली आहे. यासाठी प्राधिकरणाला कळवून देखील प्राधिकरण तात्पुरती मलमपट्टी करून जातात व पुन्हा दोन दिवसांनी जलवाहिनीला गळती लागते. पाण्याचा दाब मोठ्या प्रमाणात असल्याने ही मलमपट्टी टिकत नसल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.जलवाहिनीला ज्या ठिकाणी गळती लागली आहे, त्या ठिकाणी पडलेल्या डबक्यात मोठ्या प्रमाणात बेघर नागरिक गोंधळ घालत आहेत. धुणे, भांडी, अंघोळीसुद्धा या ठिकाणी होत असून, जणू काही या ठिकाणी धोबीघाटच आहे का? अशी परिस्थिती निर्माण झाली असून, काही विघ्नसंतोषी नागरिकच या जलवाहिनीला फोडत आहे, असेही काही नागरिकांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)जीवन प्राधिकरणचे दुर्लक्ष पाण्याची होणारी गळती थांबविण्यासाठी अनेक प्रयत्न करणारी जीवन प्राधिकरणच्या कर्मचाऱ्यांना १५ वर्षांहून अधिक काळ झाला. या जलवाहिनीची गळती काढता आली नाही. दिवसरात्र पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जल वाहिनीलाच गळती लागली असल्याने प्राधिकरणाचे या १५ वर्षांत किती नुकसान झाले याचा अंदाजसुद्धा लावता येणार नसल्याचे नागरीक सांगतात..पाण्याच्या दाबाने गळती जीवन प्राधिकरणाच्या या जलवाहिनीला प्रचंड पाण्याचा दाब असून या परिसरातल्या पाईपला दोन बेंड आहेत. त्यामुळे ही जलवाहिनी सतत फुटत आहे. रात्रं दिवस पाणी मोठ्या प्रमाणात वाया जात असल्याने त्याची तातडीने दुरूस्ती करणे आवश्यक आहे.- राजेंद्र यादव