माण, खटावसाठी पाण्याचा लढा पुढेही कायम राहील : येळगावकर

By Admin | Updated: August 20, 2016 22:10 IST2016-08-20T22:00:06+5:302016-08-20T22:10:37+5:30

वडूजला भाजपचा मेळावा : कॉँग्रेस, राष्ट्रवादीने भ्रमनिरास केला

Water fight for Maa, khataav will continue: Yelgaonkar | माण, खटावसाठी पाण्याचा लढा पुढेही कायम राहील : येळगावकर

माण, खटावसाठी पाण्याचा लढा पुढेही कायम राहील : येळगावकर

वडूज : ‘केंद्र व राज्यात भाजपाचे सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामे होऊ लागली आहेत. आपल्या आमदार पदाच्या काळात तालुक्यातील विकासकामांचा अनुशेष मोठ्या प्रमाणावर भरून काढण्यात आला. त्यानंतरच्या काळात मात्र ही विकासकामांची गती मंदावली आहे. खटाव-माण तालुक्यांना हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी आपला लढा यापुढेही कायम राहणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या राज्यकर्त्यांनी जनतेचा भ्रमनिरास केला आहे. आगामी निवडणुकांना कार्यकर्त्यांनी एकदिलाने सामोरे जाण्यासाठी सज्ज व्हावे,’ असे आवाहन माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर केले.
येथील मंगल कार्यालयात तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावादरम्यान ते बोलत होते. याप्रसंगी संघटक मंत्री रवींद्र अनासपुरे, सरचिटणीस अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कविता कचरे, खटाव तालुकाध्यक्ष विकल्प शहा, माण तालुकाध्यक्ष बाळासाहेब मासाळ, अनिल भोसले, सतीश शेटे, चंद्रकांत काळे, डॉ. महादेव कापसे, वसंतराव घाडगे, भरत मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुरुवातीला माजी आमदार दिवंगत तात्याराव जाधव, ज्येष्ठ कार्यकर्ते रामचंद्र पाटील आदींना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर भाजपाच्या विविध सेलच्या नूतन पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, विकल्पशेठ शहा आदींची भाषणे झाली. शहराध्यक्ष प्रदीप शेटे यांनी स्वागत केले. मंदार जोशी यांनी सूत्रसंचालन केले. सतीश शेटे यांनी आभार मानले.
यावेळी चंद्रकांत खुस्पे, हणमंतराव देशमुख, किसनराव इंगळे, अशोक काळे, बाळासाहेब
गोडसे, सुशील तरटे, अनिल माळी, गोपीचंद खाडे, सुयोग शेटे, किशोरी पाटील, विक्रमसिंह घाडगे, अजय शेटे, हिंदुराव बोडके, इकबाल शेख, सज्जाद शेख, राकेश सोनटे,
अमिन मुल्ला, आकाराम बोडके, गणपत खाडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)


आगामी निवडणुका ताकदीने लढवाव्यात : भोसले
अतुल भोसले म्हणाले, ‘सरकारच्या माध्यमातून गावोगावी मोठ्या प्रमाणावर विकासकामे करण्याची चांगली संधी आहे. त्यासाठी प्रत्येक गावात भाजपाची शाखा व कार्यकर्ते सक्रिय झाले पाहिजेत. शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना कार्यकर्त्यांनी जागरूकपणे तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवाव्यात. आगामी काळात होणाऱ्या येथील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका तसेच वडूज, दहिवडी येथील नगरपंचायतीच्या निवडणुकाही कार्यकर्त्यांनी ताकदीने लढाव्यात.

Web Title: Water fight for Maa, khataav will continue: Yelgaonkar