शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

वाई, फलटणला राष्ट्रवादीचा गजर

By admin | Updated: August 18, 2015 00:44 IST

बाजार समिती निवडणूक : विरोधकांचा सुफडा साफ; विजयी उमेदवारांची गुलालाची उधळण करीत मिरवणूक

फलटण : तालुक्यातील सहकार क्षेत्रातील महत्त्वाचा आर्थिक केंद्रबिंदू असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत रामराजे पुरस्कृत राजे गटाने निर्विवाद वर्चस्व राखले. बाजार समितीच्या एकूण १९ पैकी १६ जागांवर विजयी मिळवित राजे गटाने विरोधकांचे पानिपत केले. यापूर्वी राजे गटाच्या तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत. बाजार समितीसाठी रविवारी तालुक्यात ८९ टक्के मतदान झाले होते. सोमवारी (दि. १७) सकाळी आठ वाजता येथील मालोजीराजे नाईक-निंबाळकर सभागृहात मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यापासूनच राजे गट आघाडीवर होता. अकरा वाजेपर्यंत सर्व निकाल हाती आले तेव्हा राजे गटाचे १६ उमेवार विजयी झाले. यापूर्वी राजे गटाच्या तीन जागा बिनविरोध झाल्या होत्या. राजे गटाने १९ पैकी १९ जागांवर विजय मिळवित विरोधकांचे पानिपत केले. निवडणुकीतील विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते : सोसायटी सर्वसाधारण गट मतदार संघातून रधुनाथराजे नाईक-निंबाळकर ११४७, शिवरूपराजे खर्डेकर १२५७, मोहनराव निंबाळकर ११२२ , बबन खोमणे ११२२, विनायक पाटील १२४८, बाळकृष्ण रणवरे १२३६, भीमराव शेडगे १२४५, सोसायटी राखीव महिला मतदारसंघातून कमल शिवाजी लंगुटे १२७३, लता सुदाम सूळ १२५२, विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्ग लक्ष्मण शंकर लोखंडे १३१०, इतर मागास प्रवर्ग प्रकाश बबन भोंगळे १२७९, ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघातून विजयकुमार शेडगे ७५८, भगवान दादा होळकर ७४३, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल परशुराम फरांदे ७७०, ग्रामपंचायत अनुसूचित जातींमधून प्रकाश सुखदेव धाइंजे ७६५, हमाल-मापाडी मतदार संघातून बापू हरी करे ४२ हे उमेदवार निवडून आले. बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळाचे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी कौतुक केले. मतमोजणी नंतर विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत शहरातून विजयी फेरी काढली. (प्रतिनिधी)