शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

तीन ग्रामपंचायतींसाठी २३ रोजी मतदान

By admin | Updated: November 9, 2014 23:26 IST

फलटण तालुका : सहा जागा राहणार रिक्त; मोझरी बिनविरोध होण्याची शक्यता

फलटण : फलटण तालुक्यात माझेरी, गोळेवाडी, उळुंब या तीन पुर्नवसित गावठाणातील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक आणि आसू व ढवळेवाडी या दोन ग्रामपंचायतीमधील प्रत्येकी एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी रविवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. माझेरी, गोळेवाडी आणि उळुंब या तीन ग्रामपंचयतीमधील प्रत्येकी ७ जागा आणि आसू व ढवळेवाडी येथील दोन जागांच्या पोटनिवडणुकीसाठी उमेद्वारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी शनिवारी एकूण १७ उमेदवारी अर्ज दाखल झाले, तर ६ जागांसाठी अर्जच दाखल न झाल्याने या जागा रिक्त राहणार आहेत. माझेरी ग्रामपंचायतीमधील ७ जागांपैकी ओबीसी महिला व ओबीसी सर्वसाधारण या दोन जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने त्या रिक्त राहणार आहेत. सर्वसाधारण १ व सर्वसाधारण महिला २ जागांसाठी प्रत्येकी एक-एक अर्ज आल्याने या जागांची निवड बिनविरोध झाली आहे. सर्वसाधारण आणि सर्वसाधारण महिला राखीव या जागांसाठी प्रत्येकी २ उमेदवारी अर्ज आल्याने या दोन जागांसाठी निवडणूक होणार आहे. तथापि, दि. १२ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असल्याने त्यावेळी दोन अर्ज मागे घेतले गेले तर संपूर्ण ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. गोळेवाडी येथील एकूण ७ जगांपैकी ओबीसी महिला २ जागा आणि अनुसूचित जाती महिला १ जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने या जागा रिक्त राहणार आहेत. उर्वरित पैकी ३ जागांसाठी प्रत्येकी १ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने या जागांची निवड बिनविरोध होणार आहे, तर एका सर्वसाधारण जागेसाठी २ अर्ज दाखल झाल्याने या जागेसाठी निवडणूक होणार आहे. उळुंब येथील ७ पैकी ४ जागांची निवड बिनविरोध झाली आहे, तर ओबीसी महिला व ओबीसी सर्वसाधारण तसेच अनुसूचित जाती महिला जागेसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने या जागा रिक्त राहणार आहेत. आसू ग्रामपंचायतीमधील एका जागेसाठी एकच अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार आहे तर ढवळेवाडी येथील एका जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने ही जागा रिक्त राहणार आहे. (प्रतिनिधी)आज अर्जांची छाननीदाखल उमेदवारी अर्जांची छाननी सोमवार दि. १० रोजी करण्यात येणार असून, बुधवार दि. १२ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. रविवार दि. २३ रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच यावेळेत मतदान घेण्यात येणार असून, सोमवार दि. २४ रोजी तहसील कार्यालय फलटण येथे मतमोजणी व नंतर निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.