शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

वटग्रामचे झाले वडगाव

By admin | Updated: April 4, 2015 00:03 IST

नांदनी नदीकाठी गाव : हुतात्म्यांच्या पदस्पशार्न पावन भूमी--नावामागची कहाणी-सहवीस

राजू पिसाळ - पुसेसावळी -सहाशे वर्षांची संत परंपरा व हुतात्म्यांच्या देशभक्तीने पावन झालेल्या वडगावचे सध्याचे मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज हे वडगाव संस्थानची व भागवत धर्माची अखंड सेवा करत होते. सातारा-सांगलीच्या हद्दीवर वडगाव हे गाव नांदनी नदीकाठी वसले आहे. पूर्वी या गावचे नाव वटगाव म्हणजे ‘नेग्रोदग्राम’ होते. शांतिलिंगाप्पा यांनी शिष्य श्री कृष्णाप्पास्वामी यांना उपदेश केला की वटग्रामी या गावी जाऊन प्राचीन भवानी शंकर मंदिरात उपासना करावी. श्री कृष्णाप्पास्वामी यांनी शके १५०४ मध्ये भवानी शंकर मंदिराशेजारी मठाची निर्मिती करण्यास सुरुवात केली. या कार्यासाठी त्यांना उत्तम शिष्यांची उणीव भासत होती.अहमदनगर जिल्ह्यातील कातराबाद मांडवगण येथील भिकाजी देशपांडे व कृष्णाबाई देशपांडेचे यांच्या घरी शके १५२१ म्हणजे इ.स. १५९९ ला गोकुळ अष्ठमीच्या दिवशी श्री जयराम स्वामी यांचा जन्म झाला. श्री जयराम स्वामी यांनी श्री आंबेजोगाई मातेची फार उपासना केली. तेव्हा श्री मातेच्या आशीर्वादाने व उपदेशाने ते पंढरपूरला गेले. पंढरपूरमध्ये तपश्यर्चा करत असताना त्यांची भक्ती व निष्ठा पाहून पांडुरंग प्रसन्न होऊन त्यांच्या बरोबर पश्चिमेला सुमारे शंभर किलोमीटर वटग्रामच्या माळावर आले. त्याठिकाणी पांडुरंग गुरू श्री कृष्णाप्पास्वामी व श्री जयराम स्वामी यांचा त्रिवेणी संगम झाला. आज त्या माळाला ‘विठोबाचे माळ’ म्हणून ओळखले जाते.श्री जयराम स्वामींच्या भेटीला छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ पंचायतन, संत तुकाराम महाराज व संत बहिणाबाई यांच्याबरोबर आध्यात्मिक सलोखा होता. श्री कृष्णाप्पास्वामी यांनी संजीवन समाधी घेतल्यानंतर मठाची धुरा सांभाळून भागवत धर्माचा प्रसार करण्यासाठी वडग्राम संस्थानची धुरा सांभाळून आजन्म ब्रह्मचर्य स्वीकारून आसाच वारसा पुढे चालू ठेवण्याच्या परंपरा निर्माण केली. स्वामींच्या भक्ती कार्यामुळे वाड्मयामुळे वडग्रामचे नाव ‘वडगाव जयराम स्वामी’ नावाने ओळखले जात आहे. कासार घाटावर मठश्री जयराम स्वामी वडग्राम या ठिकाणी आल्यानंतर श्री कृष्णाप्पास्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली उपासना करत असताना ग्रंथनिर्मिती करण्यास सुरुवात केली. श्री जयराम स्वामी यांचा संत स्नेह फार होता. भागवत धर्माचा प्रचार व प्रसार करत भारत भ्रमण करताना पंढरपूर येथे कासार घाटावर विठ्ठल भक्तांसाठी मठ बांधला.