शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचारासाठीच सत्तेचा वापर

By admin | Updated: September 15, 2014 23:25 IST

पंकजा मुंडे : फलटण येथे संघर्ष यात्रेत ‘आघाडी’वर हल्लाबोल

फलटण : ‘काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने गेली पंधरा वर्षे सत्ता केवळ भ्रष्टाचार करण्यासाठीच वापरली आहे. त्यांच्या काळात अनेक घोटाळे झाले आहेत. याच काळात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, राज्याला अधोगतीला नेणाऱ्या दोन्ही काँगे्रसची सत्ता विधानसभा निवडणुकीत उलथवून टाका,’ असे आवाहन आमदार पंकजा मुंडे-पालवे यांनी केले.आमदार पंकजा मुंडे-पालवे यांच्या संघर्ष यात्रेचे आज, रविवारी येथे आगमन झाले. त्यावेळी आयोजित सभेत त्या बोलत होत्या. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, प्रदेश भाजपच्या सरचिटणीस कांताताई नलवडे, ‘भाजप’चे जिल्हाध्यक्ष भरत पाटील, स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, ‘रासप’चे जिल्हाध्यक्ष बजरंग गावडे, स्वराज संघटनेचे अध्यक्ष दिगंबर आगवणे, नगरसेवक अनुप शहा, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दशरथ चांगण, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, बजरंग खटके, विराज खराडे, दादासाहेब चोरमले, डॉ. वि. रा. त्रिपुटे, उत्तमराव भोसले उपस्थित होते.आ. मुंडे-पालवे म्हणाल्या, ‘वीस वर्षांपूर्वी गोपीनाथ मुंडे यांनी जनसामान्यांसाठी संघर्षयात्रा काढून काँग्रेसचे सरकार उलथवून टाकले होते. आता त्यांचा वारसा मी गोरगरिबांच्या आशीर्वादावर जपत संघर्षयात्रा काढली आहे. काँग्रेस आघाडीने भ्रष्टाचार, अत्याचार व मनमानी कारभार चालविला आहे. त्याचा भांडाफोड या माध्यमातून करून जनतेत जनजागृती करण्याचा आपला प्रयत्न आहे.’‘धनगर समाजाला न्याय देण्याची भूमिका गोपीनाथ मुंडे यांनी घेतली. त्यांचे अखेरचे भाषणही चौंडी येथे झाले होते. माझ्या संघर्ष यात्रेची सांगताही चौंडी येथेच होणार आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. सामान्य माणसेच क्रांती घडवतात. गोपीनाथ मुंडेंनी क्रांती घडविली. महादेव जानकर यांनी बारामतीकरांच्या तोंडाला फेस आणला. सदाभाऊ खोत यांनी साखरसम्राटांना जेरीस आणले, तर नरेंद्र मोदींसारखा सामान्य माणूस पंतप्रधानपदी बसतो, हे येथील सर्वसामान्य जनताच करू शकते,’ असेही मुंडे-पालवे म्हणाल्या. यावेळी सदाभाऊ खोत यांचेही भाषण झाले. (प्रतिनिधी)