विद्यार्थ्याशी अनैसर्गिक कृत्य; शिक्षकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 00:12 IST2019-11-22T00:11:26+5:302019-11-22T00:12:12+5:30

वडूज : येथील एका संस्थेच्या आश्रमशाळेतील शिक्षकाने त्याच शाळेतील विद्यार्थ्याशी अनैसर्गिक कृत्य केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. याप्रकरणी वडूज ...

Unnatural act with the student; Teacher arrested | विद्यार्थ्याशी अनैसर्गिक कृत्य; शिक्षकाला अटक

विद्यार्थ्याशी अनैसर्गिक कृत्य; शिक्षकाला अटक

वडूज : येथील एका संस्थेच्या आश्रमशाळेतील शिक्षकाने त्याच शाळेतील विद्यार्थ्याशी अनैसर्गिक कृत्य केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. याप्रकरणी वडूज पोलिसांनी प्रसाद अशोक गलांडे (वय २१) याला तत्काळ अटक केली.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पीडित विद्यार्थ्याच्या भावाने वडूज पोलीस ठाण्यात प्रसाद अशोक गलांडे (वय २१, रा. भवानीनगर वडूज, मूळ रा. गोंदवले, ता. माण) याच्याविरोधात तक्रार दिली आहे. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संशयिताने त्याच शाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला बुधवारी रात्री दहाच्या सुमारास प्रसाद अशोक गलांडे याने पोहे व सरबत करण्यास सांगितले होते. त्यानंतर पीडित मुलाने पोहे व सरबत संशयिताच्या खोलीत आणल्यानंतर त्याने खोलीचा दरवाजा लावून त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले.
पीडिताने याची माहिती नातेवाइकांना दिल्यानंतर संशयितावर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

Web Title: Unnatural act with the student; Teacher arrested