गणवेशाचे जादा अनुदान लवकरच शाळांमध्ये !

By Admin | Updated: July 17, 2014 23:17 IST2014-07-17T23:14:41+5:302014-07-17T23:17:56+5:30

प्रशासन सतर्क : पटसंख्येनुसारच शासनाकडून अनुदान

Uninterrupted grants are soon in schools! | गणवेशाचे जादा अनुदान लवकरच शाळांमध्ये !

गणवेशाचे जादा अनुदान लवकरच शाळांमध्ये !

ढेबेवाडी : तालुक्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे जादा अनुदान लवकरच जमा होणार असल्यामुळे हा प्रश्न निकाली निघणार आहे. शाळा सुरू होऊन एक महिना उलटला. विद्यार्थ्यांच्या मोफत गणवेश योजनेची रक्कम कधी येणार, याकडे शिक्षकांचे लक्ष लागून राहिले होते.
दरम्यान, अनेक शाळांना विद्यार्थीसंख्येएवढी गणवेशाची रक्कम कधी प्राप्त होणार, याची प्रतीक्षा लागून राहिली होती. तसेच या योजनेचे निकष बदलून चालू वर्षी दाखल झालेल्या विद्यार्थी संंख्येवरच गणवेशाची रक्कम मिळावी, अशी मागणी शिक्षक-पालकांमधून केली गेली होती.
जिल्हा परिषदेच्या प्रथमिक शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थी-विद्यार्थिनींना तसेच सर्वसाधारण वर्गातील मुलींना शिक्षण विभागाकडून मोफत गणवेश वितरित करण्यात येतात़ मात्र, त्यामध्ये अडचणी निर्माण होऊ लागल्याने शासनाने आता रक्कम देण्यास सुरुवात केली.
गणवेशाची रक्कम देताना शिक्षण विभागकडून काही निकष लावले जातात त्यामध्ये गतवर्षी सप्टेंबर महिन्यात शाळेत असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या निश्चित केली जाते़ तसा अहवाल शिक्षण विभागाकडे दिल्यानंतर त्यावेळच्या संख्येनुसार शाळा व्यवस्थापन समितीकडे रक्कम वर्ग केली जाते़ मात्र जून महिन्यात या विद्यार्थीपटामध्ये मोठी अदलाबदल होते. काही शाळांमध्ये नव्याने विद्यार्थी दाखल होतात तर काही शाळांमधून विद्यार्थी स्थलांतरित होतात़
एका गणवेशासाठी दोनशे रुपये याप्रमाणे शासनाकडून शाळा व्यवस्थापन समित्यांच्या खात्यावर बँकेत अनुदान जमा झाले आहे़ हे अनुदान जमा झाल्याने शिक्षकांचा जीव भांड्यात पडला; पण नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे काय? त्यांना शासन निर्णयानुसार गणवेश देणे बंधनकारक असल्याने त्यांना गणवेश कुठून द्यायचा. असा प्रश्न शिक्षकांसमोर निर्माण झाला होता.
दरम्यान, या योजनेअंतर्गत नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थीसंख्येवरच हे अनुदान दिल्यास बरे होईल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला़ (वार्ताहर)

Web Title: Uninterrupted grants are soon in schools!