शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

सुळेवाडी येथे मामा-भाच्याचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 15:03 IST

Crimenews Satara : पाटण तालुक्यातील सुळेवाडी (सोनवडे) येथे जनावरे धुण्यास गेलेल्या मामा आणि भाचा या दोघांचाही मोरणा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. एकाच वेळी दोघांचा आकस्मित मृत्यू घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. अशोक शंकर कदम, अनिकेत हरिबा चव्हाण असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

ठळक मुद्देसुळेवाडी येथे मामा-भाच्याचा बुडून मृत्यूएकाच वेळी दोघांचा आकस्मित मृत्यू घडल्याने परिसरात खळबळ

पाटण : पाटण तालुक्यातील सुळेवाडी (सोनवडे) येथे जनावरे धुण्यास गेलेल्या मामा आणि भाचा या दोघांचाही मोरणा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. एकाच वेळी दोघांचा आकस्मित मृत्यू घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. अशोक शंकर कदम, अनिकेत हरिबा चव्हाण असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मूळ गाव सोनवडे येथील अशोक शंकर कदम (वय ३५) हे बुधवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान बहिणीचा मुलगा अनिकेत हरिबा चव्हाण (१७, रा जिंती ता. पाटण) हा मामाच्या घरी आला होता. याच्यासमवेत मोरणा नदीवर गुरांना पाणी देऊन त्यांना धुण्यासाठी म्हणून गेला होता. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत गुरे घरी परतली नाही.

अशोक आणि अनिकेत हे दोघेही घरी परत आले नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबाने आणि गावांतील तरुणांनी रात्रभर नदीकाठी शोध घेतला असता दोघेही सापडले नाहीत. मात्र गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास मोरणा नदीतील खोल डोहात शोध सुरू असताना प्रथम अशोक आणि नंतर अनिकेत याचा मृत्यूदेह सापडला.

अशोक हा अविवाहित असून एका सहकारी संस्थेत काम करीत होता तर अनिकेत हा मूळचा जिंती येथील बारावीत शिकणारा आहे. लग्न समारंभाच्या निमित्ताने दोनच दिवसांपूर्वी मामाच्या गावाला (सुळेवाडी) येथे आला होता. मात्र मामा आणि भाचा या दोघांवर ही काळाने झडप घातल्याने जिंती आणि सोनवडे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

घटनास्थळी पाटणचे पोलीस निरीक्षक नितीन चौखंडे यांनी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. दोन्ही मृत्यूदेहाची उत्तरीय तपासणी पाटण येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात येऊन सुळेवाडी येथे दोन्ही मृत्यूदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर