साताऱ्यातील मोती चौकातून दुचाकी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:34 IST2021-01-17T04:34:32+5:302021-01-17T04:34:32+5:30

सातारा : येथील मोती चौकात असणाऱ्या हॉटेल पर्लच्यासमोर पार्क केलेली दुचाकी चोरीला गेल्याची घटना दि. ३ जानेवारी रोजी दुपारी ...

Two-wheeler stolen from Moti Chowk in Satara | साताऱ्यातील मोती चौकातून दुचाकी चोरी

साताऱ्यातील मोती चौकातून दुचाकी चोरी

सातारा : येथील मोती चौकात असणाऱ्या हॉटेल पर्लच्यासमोर पार्क केलेली दुचाकी चोरीला गेल्याची घटना दि. ३ जानेवारी रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. याबाबत नितीनकुमार रामचंद्र शिखरे (वय ४५, रा. चैतन्यप्रसाद कॉम्प्लेक्स, रांगोळी कॉलनी, शाहुपुरी, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. त्यांनी मोती चौकातील हॉटेल पर्लच्या समोर दुचाकी (क्र. एमएच ११ - सीएन ६४९४) लॉक करून पार्क केली होती. मात्र, अज्ञात चोरट्याने ती चोरुन नेली. दरम्यान, पार्क केलेल्या ठिकाणी दुचाकी नसल्याचे पाहून नितीनकुमार शिखरे यांनी तिचा परिसरात शोध घेतला मात्र, ती सापडून आली नाही. यानंतर त्यांनी दि. १५ रोजी याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिल्यानंतर अज्ञातावर गुन्हा दाखल झाला. पोलीस नाईक घोडके हे अधिक तपास करत आहेत.

Web Title: Two-wheeler stolen from Moti Chowk in Satara