साताऱ्यात शाॅर्टसर्किटमुळे दुचाकीला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:26 IST2021-07-11T04:26:13+5:302021-07-11T04:26:13+5:30

सातारा : शहरातील पोवई नाका या मध्यवर्ती ठिकाणी शुक्रवारी मध्यरात्री आग लागून दुचाकी जळून खाक झाली तर एका कारसह ...

Two-wheeler catches fire in Satara due to short circuit | साताऱ्यात शाॅर्टसर्किटमुळे दुचाकीला आग

साताऱ्यात शाॅर्टसर्किटमुळे दुचाकीला आग

सातारा : शहरातील पोवई नाका या मध्यवर्ती ठिकाणी शुक्रवारी मध्यरात्री आग लागून दुचाकी जळून खाक झाली तर एका कारसह अन्य एका दुचाकीला आगीची झळ पोहोचली. यामुळे तिन्ही वाहनांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. एका दुकानासमोर असलेल्या सीसीटीव्हीमुळे या आगीचं कारण उलगडलं. एका दुचाकीला अचानक शाॅर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे निष्पन्न झाले.

याबाबत अधिक माहिती अशी, पोवई नाक्यावर रस्त्याच्याकडेला रात्रीच्या सुमारास अनेक वाहने पार्क केली जातात. यातील एका दुचाकीला शुक्रवारी रात्री दोनच्या सुमारास आग लागली. आगीचे लोळ पसरल्यानंतर काही लोकांना जाग आली. रस्त्यावर येऊन लोकांनी पाहिले असता, एक दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली होती. तर या जळालेल्या दुचाकीच्या शेजारी उभी असलेली एक कार आणि दुचाकीलाही आगीची झळ बसली. कारची पुढील बाजू थोडी जळली तर दुसऱ्या दुचाकीचीही पुढील बाजूच जळली. यात तिन्ही वाहनांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र, ही आग लावली की लागली, याबाबत शहरात सकाळी चर्चा सुरू झाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत पंचनामा करण्यास सुरूवात केली. ज्याठिकाणी ही घटना घडली, तेथील एका दुकानासमोरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. त्यावेळी या आगीचे कारण स्पष्ट झाले. ही आग सुरूवातीला एका दुचाकीला शाॅर्टसर्किटमुळे लागली. त्यानंतर शेजारील कार आणि दुसऱ्या दुचाकीलाही आगीची झळ बसल्याचे समोर आले. सातारा शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: Two-wheeler catches fire in Satara due to short circuit