शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात ट्रकने दोघांना चिरडले

By admin | Updated: June 28, 2014 00:33 IST

दोन अपघात : संतप्त जमावाकडून ट्रकची तोडफोड

सातारा / किडगाव : सातारा शहराजवळ दोन ठिकाणी झालेल्या अपघातांत दोघेजण जागीच ठार झाले आहेत. प्रदीप रघुनाथ बडदरे आणि संजय विष्णू कणसे अशी मृत झालेल्यांची नावे आहेत. दोघेही सातारा तालुक्यातील होते. हे अपघात शुक्रवारी दुपारी व सायंकाळच्या सुमारास झाले.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास प्रदीप बडदरे (वय २६, रा. सारखळ, ता. सातारा) हा युवक दुचाकीवरून साताऱ्यातून मेढा रस्त्याने सारखळकडे जात होता. त्याच्या दुचाकीवर कृष्णात भाऊसाहेब साळुंखे (वय ३१, रा. सारखळ) हा बसला होता. येथील करंजेतील टीसीपीसीजवळ आल्यावर समोरील बाजूने वाळूने भरलेला ट्रक येत होता. या ट्रकची व दुचाकीची धडक झाली. यामध्ये प्रदीप बडदरे हा गंभीर जखमी झाला. कृष्णात साळुंखे जखमी झाला. गंभीररीत्या जखमी झालेल्या प्रदीपला दुपारी साडेबाराच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच प्रदीपचा मृत्यू झाल्याचे सांगितले. दुसरा अपघात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सातारा शहराजवळील कोडोलीच्या पुढे रहिमतपूर रस्त्यावर खोकडवाडी फाट्याजवळ घडला. संजय कणसे (वय ४५, रा. अंगापूर वंदन, ता. सातारा) हे दुचाकी (एमएच ११ बीबी ७८९३) वरून अंगापूर वंदनकडे चालले होते. यावेळी समोरून आलेल्या ट्रक (एमएच ४३ वाय ७४८८) ने दुचाकीला धडक दिली. यामध्ये कणसे हे जागीच ठार झाले.