साताऱ्यात दोन लाखांची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:43 IST2021-09-27T04:43:15+5:302021-09-27T04:43:15+5:30

सातारा : येथील संभाजीनगरमधील श्रीसाई काॅलनीजवळ राहणाऱ्या नवनाथ यदू केंजळे (वय ५१) यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी घरातील सुमारे ...

Two lakh burglary in Satara | साताऱ्यात दोन लाखांची घरफोडी

साताऱ्यात दोन लाखांची घरफोडी

सातारा : येथील संभाजीनगरमधील श्रीसाई काॅलनीजवळ राहणाऱ्या नवनाथ यदू केंजळे (वय ५१) यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी घरातील सुमारे २ लाख २२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना दि. २४ रोजी मध्यरात्री घडली.

केंजळे कुटुंबीय बाहेरगावी गेले होते. यादरम्यान चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाच्या कोयंड्याचे स्क्रू आणि काेयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील बेडरुममधील कपाटात ठेवलेले १ लाख २० हजार रुपयांचे साडेचार तोळ्यांचे सोन्याचे मणिमंगळसूत्र तसेच कानांतील लोंबते, फुल, सोन्याचे दोन मणी, अंगठ्या, सोन्याचे बदाम, चांदीच्या चार जोडव्यांचे जोडे, छल्ले, करगोटा, पैंजण, पाचशे रुपयांची रोकड असा सुमारे २ लाख २२ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.

एवढ्या रकमेचे दागिने चोरीस गेल्याने सहायक पोलीस अधीक्षक ऑचल दलाल यांनी घटनास्थळी भेट दिली. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम करत आहेत.

Web Title: Two lakh burglary in Satara