शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

धार्मिक संस्थानांकडून जिल्ह्याला दोन कोटी!

By admin | Updated: April 15, 2015 00:19 IST

विजय शिवतारे : जलयुक्त अभियानासाठी ‘कार्पोरेट’ सहभाग घेणार

सातारा : ‘जलयुक्त शिवार अभियानासाठी कार्पोरेट कंपन्यांचा सहभाग घेतला जाणार आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण, खंडाळा याठिकाणी मोठे उद्योग उभारले गेले आहेत. एका चांगल्या कामासाठी उद्योगांची सामाजिक जबाबदारी या हेतूने कंपन्यांकडून निधी उभा केला जाईल,’ अशी माहिती पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिली. तसेच ‘जलयुक्त शिवार’ च्या कामासाठी सिध्दीविनायक ट्रस्ट व साई संस्थानने एकूण प्रत्येकी एक कोटी रुपये सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला दिले आहे,’ असेही त्यांनी सांगितले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात रोहयो व जलयुक्त शिवार अभियानाची जनजागृती करण्यासाठी जलदिंडी या फिरत्या वाहनांचा प्रारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते मंगळवारी झाला. त्यावेळी नियोजन भवनात घेतलेल्या बैठकीत पालकमंत्री बोलत होते. आमदार शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी पराग सोमण, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे, अधीक्षक अभियंता विजय घोगरे, प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने आदी उपस्थित होते. सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पालकमंत्री शिवतारे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. पालकमंत्री पुढे म्हणाले, ‘राज्यातील दुष्काळ निवारणासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले आहे. सातारा जिल्ह्यासाठी जिल्हा नियोजनमधून ३७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये नवीन बंधारे बांधण्यासाठी २१ कोटींची तर उर्वरित तरतूद दुरुस्तीसाठी करण्यात आली आहे. या अभियानाला नरेगाची सांगड घालावी. हे अभियान शासकीय कार्यक्रम न राहता चळवळ म्हणून उभी राहावी. या चळवळीतूनच टँकरमुक्त महाराष्ट्र हे स्वप्न पूर्ण होणार आहे. त्यासाठी संवेदनशील पध्दतीने काम करावे. शासकीय अधिकारी ‘चार्ज’ झाले आहेत. आता नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले. पराग सोमन यांनी सुरुवातीला सर्वांचे स्वागत करुन नरेगाबाबत सादरीकरण केले. याप्रसंगी पाटण प्रांताधिकारी संजीव जाधव, कऱ्हाड प्रांताधिकारी किशोर पवार, वाई प्रांताधिकारी जगदीश खेबुडकर, वाई गटविकास अधिकारी दीपा बापट, तहसीलदार राजेश चव्हाण, वाई तहसीलदार सदाशिव पडदुणे, खंडाळा गटविकास अधिकारी विलास साबळे आदींसह विविध विभागातील कार्यकर्ते कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)