शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

वाढे येथे हॉटेलचालकाला लुटणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : तालुक्यातील वाढे गावच्या हद्दीत एका हॉटेलचालकाला अडवून त्याच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोन्याची चेन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : तालुक्यातील वाढे गावच्या हद्दीत एका हॉटेलचालकाला अडवून त्याच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोन्याची चेन आणि आठ हजारांचा मोबाईल असा ६८ हजारांचा ऐवज लुटणाऱ्या चौघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेने लुटमारीत सहभागी असलेल्या संशयितांपैकी दोघांना अटक केली आहे. पैकी एकजण अल्पवयीन असल्यामुळे त्याची रवानगी रिमांड होममध्ये करण्यात आली आहे. लूटमार करणाऱ्यामध्ये एकजण अनोळखी असून, त्याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, सौरभ मंडलिक आणि शेखर सर्वगोड अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, मयूर चंद्रकांत देशमुख (वय २५, रा. निसराळे, ता. सातारा) हा युवक हॉटेल व्यवसायिक असून, शुक्रवारी (दि. १९) रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास ते आपल्या दुचाकीवरून निघाले असताना त्यांना वाढे गावच्या हद्दीत असणाऱ्या पुलाच्या पुढे सौरभ पोपट मंडलिक, शेखर रवींद्र सर्वगोड, एक अल्पवयीन मुलगा (सर्व, रा. प्रतापसिंह नगर, ता. सातारा) आणि लाल रंगाचा शर्ट घातलेला एक अनोळखी मुलगा असे चौघांनी अडविले. या चौघांनी मयूर याला धक्काबुक्की, शिवीगाळ करीत दमदाटी करण्यास सुरुवात केली. चौघांनी त्याच्या हातातील आठ हजार रुपये किमतीचा मोबाईल, मोटारसायकलची चावी आणि गळ्यातील दोन तोळे वजनाची सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावून घेतली आणि ते पळून गेले.

याप्रकरणी मयूर देशमुख यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला. यानंतर सहायक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सातारा तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपास सुरू केला होता. डीबीला मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये सहभागी असणाऱ्या संशयितांची नावे समोर आली होती. त्यानुसार शोध घेतला असता पोलिसांनी शनिवारी (दि. २०) सौरभ पोपट मंडलिक आणि शेखर रवींद्र सर्वगोड याला अटक केली. दरम्यान, तिसऱ्या संशयितालाही यावेळी ताब्यात घेण्यात आले; मात्र तो अल्पवयीन असल्यामुळे त्याची रवानगी रिमांड होममध्ये करण्यात आली.

या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी, पोलीस नाईक सुजित भोसले, पोलीस कॉन्स्टेबल सागर निकम, उत्तम पवार सहभागी झाले होते.