मूक फेरी काढून मयूरेशला श्रद्धांजली

By Admin | Updated: February 4, 2015 23:54 IST2015-02-04T22:35:19+5:302015-02-04T23:54:19+5:30

मायणी : रणजितसिंह मोहिते-पाटील यांची भेट

Tribute to Mayuras by removing silent rounds | मूक फेरी काढून मयूरेशला श्रद्धांजली

मूक फेरी काढून मयूरेशला श्रद्धांजली

मायणी : येथील राष्ट्रीय नेटबॉल खेळाडू मयूरेश भगवान पवार (वय १९) याचे केरळ येथे निधन झाल्यामुळे त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी बुधवारी येथील सर्व शाळांनी एकत्र येऊन मायणी शहरातून मूक फेरी काढली. मयूरेशवर मंगळवारी रात्री मायणीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले होते.मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाचे भारतमाता विद्यालय व ज्य२ुनिअर कॉलेज, भारतमाता इंग्लिश मीडियम स्कूल, कला-वाणिज्य महाविद्यालय, श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस, सरल इन्स्टिट्यूट आॅफ आयुर्वेदिक रिसर्च सेंटर शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी बुधवारी सकाळी मूक फेरी काढली.भारतमाता विद्यालयाच्या पटांगणातून मूक फेरीला प्रारंभ झाला. चितळी रस्ता, चांदणी चौक, मराठी शाळा, मुख्य बाजारपेठ, चावडी चौक, नवी पेठ मार्गावरून बाजारपटांगणावर ही फेरी आली. त्या ठिकाणी शोकसभा घेण्यात आली. विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)

गणेशच्या प्रकृतीत सुधारणा
मयूरेश पवारबरोबर केरळ येथे नेटबॉल स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या गणेश चौधरीच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली असून, मायणी मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याला दि. ३ रोजी रात्री उशिरा उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते.

Web Title: Tribute to Mayuras by removing silent rounds