शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील ट्रेकर्स ठोसेघर धबधब्यात अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 20:47 IST

अभियांत्रिकेचे शिक्षण घेणारे पुण्यातील निसर्ग शेट्टे, श्रेयस सातपुते, निहार श्रोत्री, अक्षय देशमुख हे चारजण मंगळवारी सकाळी ठोसेघरला फिरण्यासाठी आले होते. धबधबा परिसरात फिरून झाल्यानंतर त्यांना धबधबा ज्या ठिकाणी कोसळतो, तेथे जायचे होते.

ठळक मुद्देपुण्यातील ट्रेकर्स ठोसेघर धबधब्यात अडकले

सातारा : ट्रेकिंगसाठी उतरलेले पुण्यातील चार ट्रेकर्स ठोसेघर धबधब्यात अडकल्याने मोठी खळबळ उडाली. या ट्रेकर्सना तब्बल साडेचार तासांच्या अथक प्रयत्नानंतर पहाटे तीन वाजता धबधब्यातून वर काढण्यास यश आले. हा सारा थरार बुधवारी मध्यरात्री घडला.

अभियांत्रिकेचे शिक्षण घेणारे पुण्यातील निसर्ग शेट्टे, श्रेयस सातपुते, निहार श्रोत्री, अक्षय देशमुख हे चारजण मंगळवारी सकाळी ठोसेघरला फिरण्यासाठी आले होते. धबधबा परिसरात फिरून झाल्यानंतर त्यांना धबधबा ज्या ठिकाणी कोसळतो, तेथे जायचे होते. त्यामुळे त्यांनी दुपारी चारच्या सुमारास पायवाटेने दरीत उतरण्यास सुरुवात केली. खूप अंतर ते दरीत उतरले होते. परंतु तेथे पोहोचल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की,आपण चालत लवकर खाली आलोय. मात्र, पुन्हा वर जाणे अवघड आहे. त्यामुळे  त्यांनी दुपारी पुन्हा वरती जाण्याचा निर्णय घेतला. डोंगरावरील ओले गवत आणि पावसाचा जोर वाढत गेल्याने चौघांनाही वरती येता येत नव्हते. तोपर्यंत अंधार पडला. डोंगरातील पायवाटही दिसेनासी झाली.  त्यातील दोन युवक कसे बसे दरीतून वर आले आणि त्यांनी फोन करून साता-यातील ट्रेकर्सशी संपर्क  साधून या प्रकाराची माहिती दिली. राहुल तपासे आणि शिवेंद्रराजे भोसले ट्रेकर्सच्या टीमने रात्री साडेदहा वाजता या मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केली. रात्री एकच्या सुमारास निहार श्रोत्री, अक्षय देशमुख ही मुले दरीत आढळून आली. प्रथम त्यांना पाणी ग्लुकोन डी आणि खाण्याची पाकिटे देण्यात आली. पोटात आधार मिळाल्यानंतर या दोन्ही मुलांना ट्रेकर्सनी पहाटे तीन वाजता ठोसेघरच्या धबधब्यातून वर काढले. त्यावेळी या मुलांचा जीव भांड्यात पडला.

या मोहिमेत राहुल तपासे, शर्मा, चंद्रसेन पवार, अविनाश पवार, दिग्विजय पवार आणि इतर सहकारी ट्रेकर्स सहभागी झाले होते. त्यांच्या या यशस्वी मोहिमेबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी त्यांचे कौतुक केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर