शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
13
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
14
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
15
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
16
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
17
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल १२७ वळणांचा कास रस्त्यावर प्रवास

By admin | Updated: April 17, 2015 00:03 IST

पर्यटकांनो सावधान : अतिउत्साही पर्यटक मुकतायत जीवाला

सागर चव्हाण - पेट्री -सातारा शहराच्या पश्चिमेस २५ किलोमीटर अंतरावर कास पठार व कास परिसर जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. जिल्ह्याबाहेरील पर्यटकांची, तरुणवर्गाची या ठिकाणी सतत वर्दळ सुरू असते. निसर्गाचा मुक्तपणे आनंद लुटायचा सोडून परिसरात तरुणाई स्वैराचाराने वाहने चालविताना दिसत आहेत. आयुष्याला वळण लावणाऱ्या शिक्षण संस्कार केंद्राकडे चक्क पाठ फिरवून वाहनांवर हुल्लडबाजी तसेच धूमस्टाईल करणारी अनेक कॉलेजची तरुणाई या अवघड वळणांवर आपले आयुष्य पणाला लावत आहेत.सातारा शहराच्या बोगदा परिसरापासून सांबरवाडी, यवतेश्वर, गणेशखिंड, अनावळे, पेट्री, आटाळी, कासपर्यंत तब्बल छोटी-मोठी अशी नागमोडी, यू-टर्न असणारी १२७ वळणे आहेत. या वळणांवरून भरधाव वेगाने वाहने चालविताना समोरून येणारी वाहनेही नजरेला गुंगारा देतात. त्यामुळे वाहने चालविताना आपल्या मनाला वाटेल अशा जीवघेण्या कसरतींमुळे या अवघड वळणावर सतत अपघाताच्या घटना घडतानाचे चित्र सातारकरांनी पाहिलेले आहे. यात दोष रस्त्यावरील वळणांचा काय? उलट परिसरात फिरायला येणारी तरुणाई दुचाकी चालविताना अनेक प्रकारची हुल्लडबाजी करून स्वत: अपघाताला आमंत्रित करत आहेत, याला तीव्र उतारावर आऊट आॅफ मारणाऱ्या चारचाकी, जडमालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांचाही अपवाद वगळता येत नाही.हीच तरुणाई जेव्हा मद्यधुंद अवस्थेत दुचाकीवरून भरधाव वेगाने प्रवास करताना दुचाकीवर अनेक धूमस्टाईल मारून मोक्याच्या निश्चित ठिकाणी आपल्या करिअरला वळण लावायचे सोडून धोक्याच्या वळणावर आयुष्याचा शेवट करताना दिसत आहेत. अनेक जीवघेण्या कसरती, मोबाईलचा सर्रास वापर अशा वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत अपघाताला बळी पडत आहेत. अशा अपघातप्रसंगी प्राथमिक उपचाराची जवळपास कोणतीही सोय नसताना या तरुणाईला कोणी शिकवायचे, असा प्रश्न आहे.