शहरं
Join us  
Trending Stories
1
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
2
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
3
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
4
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
5
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
6
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
7
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
8
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
9
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
10
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
11
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
12
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
13
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
14
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
15
भाजप नेत्यांनी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली, PM मोदींचं आवाहन नेते दुसऱ्याच दिवशी विसरले!
16
'या' Infra कंपन्यांची लागली लॉटरी! ११ हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच स्टॉक सुस्साट, हाती आला रेल्वे-हायवेचा प्रोजेक्ट
17
Mumbai Crime: ब्युटीशियन मनाली यांची अंबोलीत हत्या; अवघ्या दोन तासांत मित्रास घाटकोपरमध्ये केले अटक
18
संध्याकाळपर्यंत कुणी ओळखत नव्हता, एका रात्रीत बनला हीरो, कोण आहे माधव तिवारी?  
19
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक जोमात... पोलीस कोमात!

By admin | Updated: January 14, 2015 00:36 IST

प्रवासी वाहनांची डोकेदुखी : तासन्तास ताटकळल्याने रस्त्यावर वाहनांची कोंडी

पुसेसावळी : येथील दत्तचौक व बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावरील वाहतुकीच्या कोंडीमुळे गामस्थ हैराण झाले आहेत. रस्त्यावरच तासनतास खासगी प्रवाशी गाड्या उभ्या राहून प्रवाशी भरत आहेत. त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी की खासगी वाहनधारकांसाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलीसांचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे. त्यामुळे ‘वाहतुक जोमात अन् पोलीस कोमात’ अशी अवस्था झाली आहे.
पुसेसावळी दत्त चौकापासून मुख्य बाजारपेठेपर्यंत अतिक्रमणांमुळे रस्ता वाहतुकीस अत्यंत धोकादायक बनला आहे. जुन्या बसस्थानकासमोर सुमारे चाळीस ङ्खफुटाचा रस्ता आहे. या ठिकाणी अनेक व्यावसायिंकांची दुकाने असल्यामुळे गावातील व बाहेरुन खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर लोक येतात. मात्र, हा चाळीस फुटीरस्ता खरोखरच चाळीस फुटाचा आहे का? असा प्रश्न नागरीकांना आहे. या रस्त्यावर दोन्ही बाजूस वाहनांची अतिक्रमणे असल्याने रस्ता वाहतुकीस फक्त पाच ते सहा फुटच उपलध असतो. नेहमी या चौकात वावरणारे काहीजण दररोज रस्त्यावरच गप्पा मारत उभे असतात. वाहने कितीही आली गर्दी झाली तरी रसत्यातून बाजूला होत नाहीत. दररोजचे हे चित्र डोळ्यांनी पाहूनही पोलीसांच्याकडून कोणत्याच प्रकारची कार्यवाही होत नाही.
पुसेसावळीतील पोलीस दुरक्षेत्र सदा बंदच असते. त्यामुळे या दुरक्षेत्राचा उपयोग काय? असा प्रश्न जनतेला पडला आहे. वास्तविक या दूरक्षेत्राच्या ठिकाणी पोलीस ठाणे होणे गरजेचे असताना सध्या प्रशासनाकडून कोणत्याच प्रकारे दखल घेतली जात नाही. अपुऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांमुळे दुरक्षेत्रात पोलीस कर्मचाऱ्यांचा अभाव आहे असे वरिष्ठ पोलीसांकडून सांगण्यात येते. सध्या या दूरक्षेत्रातील पोलीस उपनिरिक्षकाचे पद रिक्त आहे. त्यामुळे या दूरक्षेत्राला कोणी वालीच नाही अशी अवस्था आहे.या परिसरात कोणतीही घटना घडली तर पोलीसांना माहिती असूनही कोणी तक्रार दिल्याशिवाय पोलीस त्या घटनेकडे गांभीर्याने पाहत नाहीत असे नागरीकांचे म्हणणे आहे.
वाहतुक कर्मचारीफक्त बाुधवारी मंथली गोळा करण्यासाठी न चुकता हजर असतात. बुधवारी वाहतुकीची गर्दी झाली तरी मंथली गोळा करण्यातच दंग असतात. याला पोलीसांच्या भूमिकेत ादल होण्याची अपेक्षा ग्रामस्थांतून होत आहे.
पुसेसावळी पोलीस दुरक्षेत्राच्या या कारभाराकडे डॉ.अभिनव देशमुख यांनी स्वत: लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांतून जोर धरु लागली
आहे. (वार्ताहर)

प्रदूषणाचा धोका
पुसेसावळी येथे विविध चौकांमध्ये कायमच मेगा ब्लॉक असतो. त्यामुळे येथे ध्वनी आणि वायु प्रदुषणाचा धोका वाढला आहे. सकाळी आणि संध्याकाळी वर्दळीच्या वेळेत या परिसरातील रहिवाशांना या प्रदुषणाचा मोठा त्रास होत आहे. याचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.