शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
2
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
3
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
4
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
5
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
6
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
7
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
8
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
9
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
10
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
11
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
12
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
13
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
14
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
15
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
16
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
17
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
18
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
19
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
20
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक अस्ताव्यस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:40 IST

शिरवळ : येथील शहर व परिसरातून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी व रस्ता पार करण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नसल्याने वाहतुकीचा बोजवारा ...

शिरवळ : येथील शहर व परिसरातून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी व रस्ता पार करण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नसल्याने वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. याकडे वाहतूक पोलिसांनी याकडे तातडीने लक्ष देऊन कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.

वाहतुकीला अडथळा

सातारा : शहरातील पोवई नाका ते बसस्थानक मार्ग, राजपथ, भाजी मंडई, राधिका रस्ता या परिसरात मोकाट जनावरांच्या संख्येत वाढ झाली आहे. ही जनावरे रस्त्यातच ठाण मांडत असल्याने याचा वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. पालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत मोकाट जनावरे पकडून ती सोनगाव डेपोत सोडण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. याबाबत पालिकेने तत्काळ कार्यवाही करून जनावरांना कोंडवाड्यात ठेवावे, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

कठड्यांची दुरवस्था

मेढा : मेढा-महाबळेश्वर मार्गावरील केळघर घाटातील संरक्षक कठड्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. धोकादायक वळणांवरील कठडे तुटले असून, काही ठिकाणचे कठडे तर नावापुरतेच उरले आहेत. घाटातील धोकादायक वळणांवर दिशादर्शक फलक नसल्याचे वाहनधारकांची नेहमीच फसगत होताना दिसते. घाटातील वाहतूक सुरक्षित करण्यासाठी बांधकाम विभागाने रस्त्याचे डांबरीकरण करून संरक्षक कठड्यांची उभारणी करावी, धोकादायक ठिकाणी रिफ्लेक्टर बसवावेत, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.

जैवसाखळी धोक्यात

सातारा : डोंगराळ भागात वणवे लावण्याचे प्रमाण वाढत असून, लहान-मोठे जीव आगीत होरपळून मृत्यू पावत असल्याने जैवसाखळी धोक्यात आली आहे. निसर्गातील मानवी हस्तक्षेप न रोखल्यास मानव-वन्यजीव संघर्ष होऊ शकत असल्याने वनविभागाने काळजी घ्यावी, अशी मागणी निसर्गप्रेमींमधून होत आहे.

मद्यपींना रोखा

सातारा : कास हे नैसर्गिक जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेले स्थळ असून, केवळ हंगामात पैसे गोळा न करता वनखात्याच्या वतीने वर्षभर त्याची देखभाल केली जावी, तेथे बाटल्या आणून दारू पिणाऱ्यांना अटकाव केला जावा, अशी मागणी निसर्गप्रेमींमधून होत आहे.

रस्त्याकडेला कचरा

सातारा : शहरातील शहर पोलीस स्टेशन मार्गावरील मुख्य रस्त्याकडेला असणारे नाले कचऱ्यांमुळे तुडुंब भरत आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून वाहनधारकांना व नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. यामुळे साताऱ्यात कामानिमित्त येणारे प्रवासीही नाके मुरडत आहेत.

साइडपट्ट्या खचल्या

मेढा : मेढा-महाबळेश्वर रस्त्यावरील साइडपट्ट्या खचल्या आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. विशेषत: रात्री या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांसाठी हा रस्ता अत्यंत धोकादायक बनू लागला आहे. अनेकदा येथे छोटे-मोठे अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्त दिसत नसल्यामुळे मदत मिळणे अवघड होऊन बसते.

गव्यांचे दर्शन

पेट्री : कास पठार ते महाबळेश्वर या राजमार्गावर गव्यांचे दर्शन वारंवार होत आहे. या रस्त्यावरून वर्दळ वाढली असल्याने काही वेळा दुचाकीचालक आणि गव्यांचा कळप आमने-सामने येत असून, गव्यांच्या संवर्धनासाठी या भागात तातडीने उपाय योजण्याची गरज आहे.

बससेवा लवचिक हवी

सातारा : सातारा-स्वारगेट बससेवा प्रवासीसंख्येच्या तुलनेत अपुरी पडताना दिसत आहे. पुण्याला जाणाऱ्या सातारकरांची संख्या जास्त असल्याने विशिष्ट दिवशी, विशिष्ट वेळी गर्दी होते. इतर वेळी गाड्या रिकाम्या असतात. हा विरोधाभास दूर करण्यासाठी बससेवा लवचिक करावी, अशी मागणी होत आहे.