शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्याच्या राजकारणात आज दिग्गजांची राजकीय भूमिका ठरणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 14:21 IST

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, शुक्रवारी फलटणला रामराजे नाईक-निंबाळकर, कऱ्हाडला आनंदराव पाटील, उंब्रज येथे धैर्यशील कदम आणि माण तालुक्यात जयकुमार गोरे यांच्या विरोधातील आमचं ठरलंय गटाचा मेळावा होत आहे. यामधून हे सर्व गट पुढील राजकीय दिशा ठरविणार आहेत.

ठळक मुद्देसाताऱ्याच्या राजकारणात आज दिग्गजांची राजकीय भूमिका ठरणार !जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा दिवस

सातारा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, शुक्रवारी फलटणला रामराजे नाईक-निंबाळकर, कऱ्हाडला आनंदराव पाटील, उंब्रज येथे धैर्यशील कदम आणि माण तालुक्यात जयकुमार गोरे यांच्या विरोधातील आमचं ठरलंय गटाचा मेळावा होत आहे. यामधून हे सर्व गट पुढील राजकीय दिशा ठरविणार आहेत.सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला. आता या किल्ल्यालाच भगदाड पडले आहे. तर आणखी काहीजण शिवसेना, भाजपच्या वाटेवर आहेत. यामध्ये काँग्रसचेही नेते आहेत. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी फलटणला मेळावा घेतलाय. शिवसेनेमध्ये त्यांचे जायचे निश्चित झाल्याचे सांगण्यात येतंय.

या मेळाव्यात ते अधिकृत भूमिका जाहीर करतील. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे विश्वासू आणि काँग्रेसचे आमदार आनंदराव पाटील हेही भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या गटाचा कऱ्हाडला मेळावा होत आहे. कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे नेते धैर्यशील कदम गटाचाही उंब्रजला मेळावा होत आहे. तेही पुढील राजकीय भूमिका ठरविणार आहेत.भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपमधील अनेकजण माण तालुक्यात एकत्र आलेत. त्यांच्या आमचं ठरलंय गटातर्फे दहिवडीत मेळावा होतोय. यामध्ये एका उमेदवाराचं नाव निश्चित होणार आहे. त्यामुळे शुक्रवारचा दिवस सातारा जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा ठरणार आहे.

टॅग्स :Politicsराजकारणvidhan sabhaविधानसभाSatara areaसातारा परिसर