शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

थेंबे थेंबे तळे रिकामे !

By admin | Updated: September 23, 2014 23:55 IST

वाघजाई तलावात ठणठणाट : दुरुस्तीच्या प्रस्तावाला दरवर्षी वाटाण्याच्या अक्षता

कार्वे : रोजगार हमीतून १९७२ मध्ये कऱ्हाड तालुक्यातील कार्वे येथे वाघदरा शिवारात पाझर तलाव बांधण्यात आला़ तेव्हापासून आजपर्यंत या तलावाची एकदाही दुरुस्ती करण्यात आलेली नाही़ गाळ काढण्यात आलेला नाही़ त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला तरी गळतीमुळे दोनच महिन्यांत तलावात ठणठणाट होतो़ सध्याही हीच परिस्थिती असून, तलावात थेंबभरही पाणी शिल्लक राहिलेले नाही़यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीस मान्सूनपूर्व पावसानेच अनेक ठिकाणचे तलाव भरून वाहू लागले होते़ त्यानंतर मान्सून लांबल्याने पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले़ मात्र, जुलै अखेरीस पावसाने जोर धरला़ संततधार पावसामुळे तलावांसह ठिकठिकाणची धरणेही शंभर टक्के भरली़ काही बंधारे तसेच धरणांतून पाणीही सोडावे लागले़ चांगला पाऊस झाल्याने यावर्षी सर्वत्रच पिण्याच्या पाण्यासह शेती व जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न सुटला आहे़ कऱ्हाड तालुक्यात अशी परिस्थिती असताना कार्वे गावात मात्र याउलट परिस्थिती पाहावयास मिळत आहे़ पावसाळा संपताच येथील तलावात पाणीसाठा कमी झाला आहे़ तलावात सध्या अजिबात पाणी नाही़ चाळीस वर्षांपूर्वी रोजगार हमी योजनेतून हा तलाव साकारण्यात आला़ मात्र, त्यानंतर त्याच्या दुरुस्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. पाझर तलावाची गळती काढण्याबाबत अनेकवेळा ग्रामसभेत ठरावही करण्यात आला आहे़ संबंधित ठरावाची प्रत वेळोवेळी लघुपाटबंधारे विभागास पाठविण्यात आली आहे़ मात्र, तरीही लघुपाटबंधारे विभाग या तलावाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत आहे़१९७२ मध्ये ज्यावेळी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती़ त्यावेळी रोजगार हमी योजनेतून हा तलाव साकारण्यात आला़ भविष्यातील पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टिकोनातून त्यावेळी या तलावाची निर्मिती करण्यात आली होती़ त्यावेळी उपलब्ध असणाऱ्या साधनसामूग्रीच्या जोरावर या तलावाचे काम झाले़ मात्र, सध्याच्या घडीला हे काम निकृष्ट असल्याचेच दिसते़ बांधकाम कमकुवत असल्याने तलावाला गळती लागली आहे़ यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे.काहीवेळा लघू पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष त्याठिकाणी येऊन पाझर तलावाची पाहणी केली आहे़ तातडीने दुरुस्ती होणे आवश्यक असल्याचे त्यांनीही मान्य केले होते़ मात्र, त्यानंतर काहीच कार्यवाही होत नाही़ शासनाला अहवाल सादर करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे़कार्वेतील हा तलावात पाणीसाठा टिकून राहिला तर परिसरातील शेती तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कमी होण्यास मदत होणार आहे. त्यादृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यामुळे याकडे संबंधितांनी लक्ष देण्याची गरज आहे, अशी मागणी जनतेतून होत आहे. (वार्ताहर)जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीरकार्वेतील हा वाघजाई पाझर तलाव वाघदरा नावच्या शिवारात आहे़ या शिवारात उन्हाळ्यामध्ये जनावरे चारण्यासाठी नेली जातात़ तसेच आसपासच्या वस्त्यांवरील लोकही याच तलावातील पाण्याचा पिण्यासाठी व इतर खर्चासाठी वापर करतात़ सध्या पावसाळा संपताच तलावातील पाणीही आटल्याने जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ उन्हाळ्यात या परिसरात भीषण पाणीटंचाई जाणवण्याची चिन्हे आहेत़ यावर उपाययोजना करण्याची गरज आहे.