Satara: कराडला तीन देशी पिस्तूल बाळगणारे तिघे ताब्यात, साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 16:02 IST2025-10-21T16:01:03+5:302025-10-21T16:02:16+5:30
कराड (जि. सातारा) : कराड तालुक्यातील शामगाव घाट ते कराड जाणाऱ्या रस्त्यावरील दर्शन रसवंतीगृहाच्या समोर तीन देशी बनावटीचे पिस्तूल ...

Satara: कराडला तीन देशी पिस्तूल बाळगणारे तिघे ताब्यात, साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त
कराड (जि. सातारा) : कराड तालुक्यातील शामगाव घाट ते कराड जाणाऱ्या रस्त्यावरील दर्शन रसवंतीगृहाच्या समोर तीन देशी बनावटीचे पिस्तूल (पिस्टल) बाळगणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी रात्रीच्या सुमारास ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून तीन देशी बनावटीचे पिस्तूल, ३ जिवंत काडतुसे प्लॅस्टिकचे डबीसह २ मोबाइल व १ ब्रिझा कार असा सुमारे साडेआठ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
कार्तिक अनिल चंदवानी (१९, रा. लाहोटीनगर, मलकापूर, ता. कराड), ऋतेश धर्मेंद्र माने (२२, रा. कृष्णा अंगण, बंगलो नं. सी-३, वाखाण रोड, कराड), अक्षय प्रकाश सहजराव (२८, रा. लाहोटीनगर, मलकापूर, ता. कराड) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.