शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
2
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
3
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
4
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
5
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
6
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
7
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
8
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
9
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
10
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
11
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
12
चाणक्य नीती: ऑफिस असो वा घर, प्रगतीसाठी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 'हे' १० नियम!
13
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
14
"ट्रम्प ब्रँड विषारी झालाय" म्हणत ट्रम्प टॉवरचा प्रकल्पच गुंडाळला; ऑस्ट्रेलियात बिल्डरकडून 'करेक्ट कार्यक्रम'
15
अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
16
फ्री वायफायच्या नादात चुकूनही करू नका 'हे' काम; अन्यथा एका मिनिटात बँक बॅलन्स होईल झिरो!
17
Palmistry: सरकारी नोकरी, खाजगी नोकरी की व्यवसाय? तुमच्या हातावरील रेषा काय सांगतात? 
18
Video - १ कोटीची नोकरी सोडून अपार्टमेंट्समध्ये करते साफसफाई; म्हणाली, "पैसा म्हणजे स्वातंत्र्य"
19
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
20
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
Daily Top 2Weekly Top 5

झांजवड सरपंचासह तिघांचा राजीनामा

By admin | Updated: December 2, 2014 23:35 IST

राष्ट्रवादीच्या तथाकथित पुढाऱ्यांच्या दहशतीविरोधात ग्रामस्थांचा मोर्चा

महाबळेश्वर : झांजवड गावात राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी तथाकथीत पुढारी हे शासकिय कर्मचारी यांना हाताशी धरून गावाच्या विकास कामामध्ये अडथळा आणतात. गावातील लोकांना दमदाटी करणे शिवीगाळ करणे दबाव टाकुन आवाज दाबणे अशी उर्मट वागणुक देवुन गावाला वेठीस धरून दहशत माजवितात. या दहशती विरोधात गावकऱ्यांनी महाबळेश्वर पंचायत समितीवर मोर्चा काढला. यावेळी सरपंचासह तीन सदस्यांनी राजीनामा दिला आहे. तथाकथित नेत्यांनी आपले वर्तन सुधारले नाही तर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याचा इशाराही गावाने दिला आहे.
झांजवड ता. महाबळेश्वर हे साधारण तीनशे लोकवस्तीचे गाव या गावात ग्रामपंचायतीमध्ये पाच सदस्य आहे. तर दोन जागा रिक्त आहेत. या गावाच्या विकासाकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी कायम दुर्लक्ष केले तरीही आज नाहीतर उद्या विकास कामे होतील या अपेक्षेने या गावाने राष्ट्रवादी काँग्रेसलाच साथ दिली. परंतु विकास तर झालाच नाही उलट राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांनी गावाच्या विकासात नेहमी अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. धमकी दादागिरी करून या तथाकथित नेत्यांनी गावात दहशत पसरविली. या विरुद्ध कोणी आवाज उठविण्याचा प्रयत्न केला तर ही मंडळी त्याला शिवीगाळ करून धमकी देतात. तरीही गावाने कधी या दहशती विरुद्ध आवाज उठविला नाही.
या दडपशाही विरूद्ध आवाज उठविण्याचा निर्णय घेऊन आज सर्व गावकऱ्यांनी महाबळेश्वर पंचायत समितीवर मोर्चा काढला व आपली कैफियत वरिष्ठांच्या कानावर घातली. आपल्या मागण्यांचे निवेदन गट विकास अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिले. (प्रतिनिधी)

उपाययोजना करण्याची मागणी
तसेच गावचे सरपंच शंकर नारायण जाधव व दगडु लक्ष्मण शिंदे व संगिता प्रकाश जाधव या दोन सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले. या गावकरी मंडळीनी गट विकास अधिकारी यांची भेट घेतल्यानंतर माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांची भेट घेतली व त्यांनतरही निवेदन देवुन या प्रकरणी गावाला न्याय मिळवुन द्यावा अशी मागणी केली. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.