लॉजमध्ये डांबलेल्या तीन मुलींची सुटका

By Admin | Updated: September 25, 2014 00:32 IST2014-09-24T23:22:31+5:302014-09-25T00:32:19+5:30

ओगलेवाडी : युवकांच्या प्रसंगावधानामुळे मदत

Three girls released in the lodge were released | लॉजमध्ये डांबलेल्या तीन मुलींची सुटका

लॉजमध्ये डांबलेल्या तीन मुलींची सुटका

कऱ्हाड : देहविक्रीसाठी लॉजमध्ये डांबून ठेवण्यात आलेल्या तीन मुलींची ग्रामस्थ व पोलिसांनी सुटका केली़ संबंधित तीनही मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, लॉज मालकाकडे रात्री उशिरापर्यंत याबाबत कसून चौकशी करण्यात येत होती़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओगलेवाडी येथे मुख्य चौकात लॉज असून, त्याच्या आसपास मोठी बाजारपेठ आहे. बुधवारी सायंकाळी लॉजसमोरील एका दुकानात काही युवक झेरॉक्स काढत होते़ त्यावेळी लॉजच्या खिडकीतून एक मुलगी बाहेर डोकावत असल्याचे त्या युवकांच्या निदर्शनास आले़ संबंधित मुलगी रडवेल्या चेहऱ्याने हात जोडून आपल्याला बाहेर काढा, अशी विनवणी त्या युवकांना करीत होती़ सुरुवातीला युवकांनी त्या मुलीकडे दुर्लक्ष केले़ मात्र, वारंवार ती मुलगी हात जोडून मदतीची विनंती करीत असल्यामुळे संबंधित युवकांनी हा प्रकार आसपासच्या दुकानदारांच्या निदर्शनास आणून दिला़ त्यानंतर दुकानदारांनी फोन करून याबाबतची माहिती कऱ्हाड शहर पोलिसांत दिली़
काही वेळानंतर पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले़ पोलीस पोहोचेपर्यंत संबंधित मुलगी खिडकीजवळच थांबून होती़ घटनास्थळी पोहोचल्यानंतर ग्रामस्थांसह पोलीस लॉजमध्ये गेले़ त्यांनी सर्व खोल्यांची तपासणी केली असता, तीन मुली त्याठिकाणी पोलिसांना आढळून आल्या़ पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. (प्रतिनधिी)

Web Title: Three girls released in the lodge were released